Corruption of Rs 3,000 crore under the name of Corona | कोरोनाच्या नावाखाली ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार-नारायण राणे

कोरोनाच्या नावाखाली ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार-नारायण राणे

ठळक मुद्देकोरोनाच्या नावाखाली ३ हजार कोटींचा भ्रष्टाचारमाजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार नारायण राणे यांचा आरोप

रत्नागिरी - कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार नारायण राणे यांचा रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला.

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या अनुषंगाने त्यांनी असंख्य मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, अ‍ॅड. बाबा परुळेकर उपस्थित होते.


दिशा सालियान आणि सुशांतसिंह रजपूत यांनी आत्महत्या केलेली नाही. खुनाला आत्महत्या करण्यात ठाकरे सरकारला अधिक स्वारस्य आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. उध्दव ठाकरे यांच्या पायगुणाने कोरोना आला. बाकी कशात नाही, पण कोरोनामुळे झालेल्या मृतांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे, अशी टीका करतानाच त्यांनी आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांना मदत यासारख्या सर्वच विषयांमध्ये हे सरकार अपयशी झाल्याचा दावा केला.


आपल्या सरकारने वर्षपूर्ती केल्याची मुलाखत देताना त्यांनी वर्षभरात सरकारने काय ठोस केले, याची माहितीही देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरकारने १२ हजार कोटी खर्च केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यातील असंख्य कामे आपल्याच नातेवाईकांना देऊन सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corruption of Rs 3,000 crore under the name of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.