शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळे, विद्यापीठांच्या पडीक जमिनींवर सौरऊर्जा प्रकल्प, मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 05:37 IST

Cabinet decision : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी विविध निर्णय घेण्यात आले. अपारंपरिक ऊर्जा धोरण २०२० ची अंमलबजावणी ३१ मार्च २०२७ पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबई : राज्याचे अपारंपरिक ऊर्जा धोरण २०२० मध्ये विविध प्रोत्साहनात्मक सुधारणांना सोमवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. उद्योगांनी स्वत:च्या वापरासाठी अपारंपरिक ऊर्जानिर्मिती केल्यास दहा वर्षांसाठी विद्युत शुल्कात माफी, महामंडळे, कृषी विद्यापीठांच्या पडीक जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देणाऱ्या सुधारणा करतानाच महाऊर्जाकडे नोंदणी झालेल्या ४१८ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी विविध निर्णय घेण्यात आले. अपारंपरिक ऊर्जा धोरण २०२० ची अंमलबजावणी ३१ मार्च २०२७ पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली. यासोबतच धोरणात प्रोत्साहनात्मक सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात अनेक प्रकल्प सुरू होऊन या  क्षेत्रात राज्य प्रथम स्थानावर येण्यास, तसेच राज्याची विजेची गरज भागविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

उद्योगांनी स्वत:च्या वापरासाठी सौर, पवन,  शहरी व औद्योगिक घनकचरा ऊर्जानिर्मिती व उसाच्या चिपाडावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केल्यास पहिल्या दहा वर्षांकरिता विद्युत शुल्क माफ करण्यास  मंजुरी देण्यात आली आहे, तसेच सौर व पवन वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी बिगर शेती कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच राज्य सरकारची महामंडळे, कृषी विद्यापीठे यांच्या वापर नसलेल्या जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करून राज्यातील वीज वितरण कंपन्या अथवा तिसऱ्या घटकास प्रचलित कायदे नियमानुसार वीज खरेदी करार करून वीज विक्री करण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय इमारतींवर यापूर्वी सुरू केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प महाऊर्जा मार्फत पारेषण संलग्न करताना येणारा हायब्रीड इन्व्हर्टर व  नेट मीटरिंगचा खर्च ऊर्जा विभागाच्या अनुदानामधून  करण्यास मान्यता देण्यात आली, तसेच सौर व पवन ऊर्जा आधारित पथदर्शी तत्त्वावरील एनर्जी स्टोअरेज प्रकल्प महाऊर्जामार्फत विकसित करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.  अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर हा मुद्दा मंत्रिमंडळासमोर अंतिम मान्यतेसाठी सादर करावा, असे निश्चित करण्यात आले. 

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा    ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या योजनांसाठी क्षेत्रीय स्तरावरून मंजुरीची कार्यवाही अधिक कार्यक्षमतेने करता येणे शक्य होईल.    पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रियेत भावभिन्नता कलम, तसेच असाधारण भाववाढीसाठी विशेष मदत देण्याची बाब समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी आवश्यक सिमेंट, स्टील इत्यादी घटकांच्या दरात वाढ झाल्याने वरील दोन बाबींचा निविदा प्रक्रियेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र