शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक दामलेंवर दरोड्याचा गुन्हा

By admin | Updated: June 4, 2015 04:22 IST

दलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशीष दामले यांच्याविरोधात एका आश्रम चालकास धमकावणे, दरोडा आणि दंगल माजविल्याच्या आरोपाखाली

बदलापूर : बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशीष दामले यांच्याविरोधात एका आश्रम चालकास धमकावणे, दरोडा आणि दंगल माजविल्याच्या आरोपाखाली पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारात हा प्रकार घडला असून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यांना शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांची पथके रवाना झाली असून या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.बदलापूर जवळील इदगावमध्ये नरेश रत्नाकर यांचा आश्रम आहे. येथे मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास २० ते २५ कार्यकर्त्यांसह घुसून दामले यांनी आश्रमावर दगडफेक करून त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर, घराच्या खिडकीचे गज वाकवून ते घरात शिरले. या वेळी रत्नाकर यांच्याकडे स्वरक्षणासाठी असलेली त्यांच्याकडील बंदूक हिसकावून दामलेंनी धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या वेळी दामले यांच्या सुरक्षेत असलेले दोन पोलीसही सोबत होते. त्यांनी एक लाख रुपये नेल्याचा आरोपही रत्नाकर यांनी केला.धमकावणे, घराची तोडफोड करणे, बंदुकीचा धाक दाखवून लूटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दामलेंविरोधात नोंदवले. घटनेनंतर दामले यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला फोन करून त्यांची बाजू मांडली. त्यांच्या मते या प्रकाराला राजकीय दबावाने वेगळे वळण देण्यात आले आहे. मी निवडणुकीत स्वत:ची संपत्ती ७० कोटींची दाखवलेली असताना लाख रुपयांसाठी दरोडा का टाकू, असे त्यांनी स्पष्ट केले. आश्रमात चुकीचे प्रकार घडत आल्याने आपण हा प्रकार पाहण्यासाठी गेलो होतो. तेथील व्यक्तीने गोळीबार केल्याने कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात दगडफेक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घडलेल्या प्रकाराचा साक्षीदार आपला पोलीस अंगरक्षक असून पोलीस तपासात खरी बाब पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.