शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

CoronaVirus योगी सरकारचा मजुरांना ठेंगा पण विद्यार्थ्यांच्या प्रवासाला ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 20:30 IST

केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे.

- अनंत जाधव सावंतवाडी : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या मजूर कामगारांना स्वीकारणार नसल्याचे जाहीर करत तसे पत्रच महाराष्ट्र सरकारला दिल्यानंतर याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या विषयावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असतानाच महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच आनंददायी बातमी आली असून, उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मात्र स्वीकारण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २१ मुलांना घेउन जाणारी पहिली बस सोमवारी रात्री सावंतवाडीतून सुटली आहे. या बसला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या बसमध्ये मुलांसोबत तीन शिक्षकही आहेत.

केंद्र सरकारने सर्वच राज्यांना आपले मजूर तसेच कामगार यांना आपल्या गावी पाठवण्यात यावे असा आदेश काढला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने परराज्यातील मजूर कामगार यांची यादी सुध्दा तयार केली होती. मात्र दोन दिवसापूर्वी उत्तरप्रदेश सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या मजूर कामगार यांना स्वीकारणार नाही. असे जाहीर केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. मजूर कामगार न स्वीकारत नसल्याने महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप ही सुरू झाले आहेत.

मात्र हे आरोप प्रत्यारोप सुरू असतनाच सिंधुदुर्गसाठी आनंदाची बातमी आली असून, मजूर कामगार यांना न स्वीकारणारे उत्तर प्रदेश सरकारने मात्र नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना तसेच ३ शिक्षकांना स्वीकारण्याचे ठरवले असून, सावंतवाडीतून सोमवारी रात्री उशिरा एक बस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे. या बसला सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कारण हे लॉकडाउन झाल्यापासून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांचे आई वडिलही चिंतेत होते. ते सतत येथील जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. मात्र त्यांना आपली मुले केव्हा येणार याची प्रतिक्षा करण्याशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. केंद्र सरकारने चार दिवसापूर्वी राज्यात अडकून पडलेल्यांना आपल्या घरी सोडण्याचे आदेश सर्व सरकारना दिले खरे पण उत्तर प्रदेशने आपण बाहेरील मजुरांना तसेच कामगारांना स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या चिंतेत आणखी भर पडली होती.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अखेर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्यासह सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या महत्वाच्या अधिकाºयांशी संपर्क करून या मुलांना अखेर उत्तर प्रदेशकडे रवाना केले. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यांच्यासाठी ई पास तयार करण्यात आले. त्यानंतरच शासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली आहे. एसटी बस बरोबर अतिरिक्त चालक तसेच मॅकानिक ही पाठवण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने पहिल्यांदाच मुलांना स्वीकारले :खांडेकरउत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येणारे कामगार, ूमजूर यांना उत्तर प्रदेशात घेतले जाणार नाही, अशा प्रकारचे पत्र राज्य सरकारला दोन दिवसांपूर्वी दिले होते. मात्र असे असतानाही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विशेष मेहनत घेतल्याने हे सर्व शक्य झाल्याचे सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या