किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:22 PM2020-05-05T18:22:47+5:302020-05-05T18:25:09+5:30

कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच थांबल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षे झाली. यामुळे ९ मे रोजी मॉस्कोमध्ये परेड होणार होती.

Russia honoured King Jong Un with War Medal for 75th anniversary of world War 2 hrb | किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

Next
ठळक मुद्देप्योंगयांगमधील रशियन राजदूत अलेक्झांडर मॅटसेगोरा यांनी उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री सोन ग्वोन यांना आज हे पदक दिले.गेल्या महिन्यापासून किम उन यांची तब्येत बिघडली असल्याचे म्हटले जात होते. मात्र, ते ठणठणीत असल्याचा व्हिडीओ जारी करण्यात आला.कोरियाने त्यांच्या देशात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचा दावा केला होता.

मॉस्को : उत्तर कोरियाचा हुकुमशहा असलेल्या किम जोंग उन यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या बातम्यांनी गेला आठवडा ढवळून निघाला होता. अनेकांनी तर किम यांचा मृत्यूच झाल्याचे किंवा ब्रेन डेड झाल्याचे जाहीर करून टाकले आहे. मात्र, किम २० दिवसांच्या विजनवासानंतर अचानक प्रकट झाल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या उत्तर कोरियाच्या 'हिटलर'ला रशियाने थेट वॉर मेडलच जाहीर केले आहे. 


त्याचे असे झाले की, नाझी जर्मनीवर विजय मिळविल्याला ७५ वर्षे झाली. या भीषण युद्धाच्या आठवणींच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाच्या हुकुमशहाला वॉर मेडल देऊन सन्मानित केले आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीविरोधात सोव्हिएत युनियनच्या सैनिकांच्या हौतात्म्यप्रित्यर्थ वॉर मेडल देण्यात आले आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंगमधील रशियन दुतावासाने मंगळवारी ही माहिती दिली. 


प्योंगयांगमधील रशियन राजदूत अलेक्झांडर मॅटसेगोरा यांनी उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री सोन ग्वोन यांना आज हे पदक दिले. गेल्या महिन्यापासून किम उन यांची तब्येत बिघडली असल्याचे म्हटले जात होते. मात्र, ते ठणठणीत असल्याचा व्हिडीओ जारी करण्यात आला. प्योंगयांगमध्ये आज झालेल्या या बैठकीला ते उपस्थित नव्हते. तर रशिया आणि उत्तर कोरियाचे अधिकारी मास्क घालून उपस्थित होते. कोरियाने त्यांच्या देशात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचा दावा केला होता. 


कोरोनाने दुसऱ्या महायुद्ध विजयाची परेड थांबविली
कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच थांबल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षे झाली. यामुळे ९ मे रोजी मॉस्कोमध्ये परेड होणार होती. याला उन यांनाही बोलावण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे पुतीन यांनी परेड पुढे ढकलली आहे. २०१५ मध्येही किम यांना बोलावण्यात आले होते, मात्र त्यावेळी काही कारणांनी त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नव्हते. 

महत्वाच्या बातम्या...

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

 

 

Web Title: Russia honoured King Jong Un with War Medal for 75th anniversary of world War 2 hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.