CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:10 PM2020-05-05T20:10:33+5:302020-05-05T20:11:39+5:30

आज नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे.

CoronaVirus third patient found in Sindhudurg; total number is three hrb | CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. त्यातील एका रुग्णाला यापूर्वीच बरा होऊन घरी सोडण्यात आले आहे. तर एक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल आहे.


 आज नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. सदर रुग्ण हा दिनांक २४ एप्रिल  रोजी मुंबई येथून परत आला. त्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मुंबई येथील हॉटस्पॉटमधून आल्यामुळे त्याचा दिनांक २ मे रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आता त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील या रुग्णाचे गाव कॉन्टेन्मेंट झोन केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

Web Title: CoronaVirus third patient found in Sindhudurg; total number is three hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.