शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Exclusive : अनेक जिल्ह्यांत लागला ब्रेक; राज्यात सरासरी केवळ २९.९२ टक्के लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 5:29 AM

Coronavirus Vaccination : पहिला डोस घेणारे २ कोटी ७० लाख नागरिक. तर दुसरा डोस घेणारे केवळ ८२ लाख.

ठळक मुद्देपहिला डोस घेणारे २ कोटी ७० लाख नागरिक.तर दुसरा डोस घेणारे केवळ ८२ लाख.

मुंबई : राज्यात लसीकरणाला पुन्हा मोठा ब्रेक लागला असून अनेक जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात लसीकरण ठप्प होते. सोमवारपासून लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू झाले. आतापर्यंत पहिला व दोन्ही डोस घेणाऱ्यांची सरासरी टक्केवारी २९.९२ अशी आहे. अनेक जिल्ह्यांत पहिला डोस घेणाऱ्यांना ८४ दिवस झाल्यानंतरही १० ते १५ दिवस लस मिळत नसल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीत समोर आले. 

पहिल्या पाच जिल्ह्यांत भंडारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, कोल्हापूर, बीड व नागपूर यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव व पालघर हे पाच जिल्हे तळात आहेत. मुंबईत तीन दिवस लसीकरण बंद होते, सोमवारी लसीकरण सुरू झाले. खासगी रुग्णालयात लस आहे, मात्र लसीकरण केंद्रांमध्ये लस नाही, अशी स्थिती मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महानगर प्रदेशात आहे.

कोव्हॅक्सिनचा प्रश्नकोव्हॅक्सिन लस सहज उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळत नसल्याचे चित्र आहे.

केंद्रांवर विचित्र स्थितीकुठे तरुणांना लस मिळत आहे, तर ज्येष्ठांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. कुठे ४५ ते ६० या वयोगटाला लस आहे, तर इतरांना नाही अशीही विचित्र स्थिती आहे.

मुंबईत दुसरा डोस घेणारे केवळ १२ लाखांवर

  • मुंबईत आतापर्यंत ६० लाखांवर लसीकरण झाले आहे. 
  • त्यात ४७ लाखांवर पहिला डोस घेणारे आहेत, मात्र दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या केवळ १२ लाखांवर आहे. 
  • दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये महिला (४४%) तर पुरुषांचे प्रमाण ५५% आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्गnagpurनागपूरkolhapurकोल्हापूरBeedबीड