Maharashtra Coronavirus Updates: चिंताजनक! २४ तासांत महाराष्ट्रात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित तर ८५३ मृत्यूंची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 08:49 PM2021-05-06T20:49:05+5:302021-05-06T20:50:15+5:30

आज ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४२ लाख २७ हजार ९४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत.

Coronavirus Updates: In 24 hours, Maharashtra recorded 62,194 corona-related deaths and 853 deaths | Maharashtra Coronavirus Updates: चिंताजनक! २४ तासांत महाराष्ट्रात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित तर ८५३ मृत्यूंची नोंद

Maharashtra Coronavirus Updates: चिंताजनक! २४ तासांत महाराष्ट्रात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित तर ८५३ मृत्यूंची नोंद

Next
ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.५४ टक्के एवढे झाले आहेसध्या राज्यात ३८ लाख २६ हजार ०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेतराज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ३९ हजार ०७५  इतकी आहे.

मुंबई – राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून या लाटेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी ५६ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा या आकडेवारीत वाढ होऊन राज्यात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित सापडले आहेत. त्याचसोबत आज राज्यात ८५३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.  

आज ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४२ लाख २७ हजार ९४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.५४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८६ लाख ६१ हजार ६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९ लाख ४२ हजार ७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३८ लाख २६ हजार ०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ३९ हजार ०७५  इतकी आहे.

सक्रीय रुग्णांची संख्या

मुंबई – ५५ हजार ६०१

ठाणे – ४४ हजार १५०

पालघर – १८ हजार ४२४

रायगड – ११ हजार ४७५

पुणे – १ लाख १५ हजार १८२

सातारा – २१ हजार ५२९

सांगली – १७ हजार ७०२

कोल्हापूर – १३ हजार ४८०

सोलापूर - २० हजार ८०७

नाशिक  - ४० हजार ८४१

अहमदनगर – २१ हजार ५२३

बुलढाणा - १४ हजार ८०९

यवतमाळ – ६ हजार ७८६

नागपूर -६१  हजार १७८

आज राज्यात ६२ हजार १९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ लाख ४२ हजार ७३६ झाली आहे. आज झालेल्या रुग्णांची नोंद खालीलप्रमाणे

मुंबई महानगरपालिका - ३०२८

ठाणे- ८२२

ठाणे मनपा- ६१७

नवी मुंबई मनपा- २८८

कल्याण डोंबिवली मनपा – ६०६

एकूण ठाणे विभाग – ८५२५

नाशिक विभाग – १३९८२

पुणे विभाग – १४४५३

कोल्हापूर विभाग – ४७०४

औरंगाबाद विभाग – २८०९

लातूर विभाग – ३९९१

अकोला – ५०२०

नागपूर – ८७१०

आज नोंद झालेल्या एकूण ८५३ मृत्यूंपैकी ३३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २७५ मृत्यू,  नाशिक- ९६, पुणे-५२, नांदेड-२०, ठाणे- २०, बीड- ११, बुलढाणा- ५, चंद्रपूर- ५, गडचिरोली- ५, जळगाव- ५, नागपूर- ५, रायगड- ५, सोलापूर- ५, भंडारा- ४, हिंगोली- ४, जालना-४, लातूर- ४, गोंदिया- ३, कोल्हापूर- ३, नंदूरबार- ३, वर्धा- ३, अहमदनगर- २, औरंगाबाद- २, रत्नागिरी-२, सांगली- २, अकोला- १, धुळे- १, सातारा- १, वाशिम- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus Updates: In 24 hours, Maharashtra recorded 62,194 corona-related deaths and 853 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app