Coronavirus Update : २४ तासांत राज्यात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:04 PM2021-06-09T21:04:51+5:302021-06-09T21:06:52+5:30

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढतोय. नव्या रुग्णसंख्येत होतेय घट.

Coronavirus Update Over 16000 patients in the state overcome coronavirus in 24 hours maharashtra covid 19 | Coronavirus Update : २४ तासांत राज्यात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Coronavirus Update : २४ तासांत राज्यात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढतोय.नव्या रुग्णसंख्येत होतेय घट.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वात मोठा फटका बसला होता. परंतु आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात १६,३७९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे १०,९८९ नव्या कोरोनाबाधितांचीही नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे २६१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात सद्यस्थितीला १,६१,८६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दरही आता वाढला असून तो ९५.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईत नव्या ७८८ रुग्णांची नोंद

गेल्या चोवीस तासांत मुंबईत नव्या ७८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५११ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत सध्या १५,९४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९५ इतका झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही आता ५५३ दिवसांवर गेला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus Update Over 16000 patients in the state overcome coronavirus in 24 hours maharashtra covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app