शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

CoronaVirus Update: राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच; आज तब्बल 62,097 नवे कोरोना बाधित, कडक लॉकडाऊनची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 22:58 IST

राज्यात आतापर्यंत एकूण 39,60,359 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 32,13,464 रुग्ण कोरोनातून बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. (CoronaVirus)

मुंबई - संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्य सरकार प्रयत्न करत असूनही महाराष्ट्रातील नव्या कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 62,097 नवे कोरोना बाधीत सरमोर आले आहेत. तर याच काळात नवीन 54,224 कोरोना बाधित बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज 519 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा आता 61,343 वर पोहोचला आहे. (CoronaVirus update Maharashtra reports 62097 new covid-19 cases)

राज्यात आतापर्यंत एकूण 39,60,359 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 32,13,464 रुग्ण कोरोनातून बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. याच बरोबर राज्यात आता एकूण 6,83,856 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सोमवारी, 58,924 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 351 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील टॉप 15 मुद्दे... एका क्लिकवर

लावला जाऊ शकतो कडक लॉकडाउन -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, मंत्री अस्लम शेख यांनीही संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यात पुढील 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील घोषणा बुधवारी होणार असल्याची मंत्रालयीन सुत्रांची माहिती आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

असा असेल कडक लॉकडाऊन -सरकारच्या लॉकडाऊन घोषणेनुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. तर, सरकारी कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षाही कमी कर्मचाऱ्यांनी हजर रहावे, ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक वाहतूकही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच ती वाहतूक उपलब्ध राहिल. जिल्हाबंदीच्या दृष्टीकोनातूनही सरकार विचार करत आहे. त्यामध्ये, जिल्ह्याबाहेर जायचे असल्यास यापूर्वीप्रमाणे प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे समजते. 

अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते 11 पर्यंतच परवानगी -राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकाने बंद राहणार आहेत. 

CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

राज्यांनी लॉकडाऊन टाळायचाच प्रयत्न करा, तो शेवटचा पर्याय असू देत - पंतप्रधानलहान मित्रांना माझी विनंती आहे, घरातील लोकांना घराबाहेर पडू देऊ नका. प्रसार माध्यमांनीही लोकांना कोरोना निमयावलींचे पालन करण्याचे आवाहन करावे. आजच्या स्थितीत आपल्याला लॉकडाऊनपासून दूर रहायचं आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, लॉकडाऊन पासून दूर राहण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा, असे आवाहन मोदींनी केलंय.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे