शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

Coronavirus Update : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम; चोवीस तासांत ३६,९०२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 9:41 PM

Coronavirus Update : महाराष्ट्रात रविवारपासून रात्री जमावबंदीचे आदेश

ठळक मुद्देमहाराष्ट्रात रविवारपासून रात्री जमावबंदीचे आदेशमुंबईतही पुन्हा ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णवाढ

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३६ हजार ९०२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर १७ हजार ०१९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात ३६ हजार ९०२ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १७ हजार ०१९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर ११२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत २६ लाख ३७ हजार ७३५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २३ लाख ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ८२ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८७.२ टक्के इतका आहे. मुंबईत पुन्हा ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णशुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. शुक्रवारी मुंबईत ५ हजार ५१३ कोरोनाबाधित सापडले. तर १ हजार ६५८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. सध्या मुंबईत ३७ हजार ८०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होऊन ६८ दिवसांवर आला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडू देण्यात आली.रात्रीची जमावबंदीराज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी ( २८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले. कडक निर्बंधांचे संकेतजनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक  निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतू डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी,  गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका