CoronaVirus: "सर्व विद्यापीठांत उभारणार कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:46 AM2020-04-25T05:46:53+5:302020-04-25T05:47:51+5:30

सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सामंत यांनी संवाद साधला.

CoronaVirus testing laboratories to be set up in all universities says uday samant | CoronaVirus: "सर्व विद्यापीठांत उभारणार कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा"

CoronaVirus: "सर्व विद्यापीठांत उभारणार कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा"

Next

मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सामंत यांनी संवाद साधला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून ते लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करू शकतील. हा अभ्यासक्रमाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना गिरवता येतील, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हिड - 19 साठी देवून सहकार्य करावे असे, आवाहनही त्यांनी केले.

परीक्षेबाबत अद्याप निर्णय नाही
राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे उदय सामंत यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title: CoronaVirus testing laboratories to be set up in all universities says uday samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.