शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Coronavirus : जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कायम राहणार - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 2:41 AM

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर २१ दिवसांच्या ह्यलॉकडाऊनह्णची घोषणा केली असली तरी आपल्या राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे.

मुंबई : ह्यकोरोनाह्णच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या देशभर ह्यलॉकडाऊनह्णच्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, परंतु याचा दुध, भाजीपाला, फळे, औषधै, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. हा पुरवठा यापुढेही पूर्ववत नियमित सुरु राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, घराबाहेर पडून खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर २१ दिवसांच्या ह्यलॉकडाऊनह्णची घोषणा केली असली तरी आपल्या राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळातही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्याबाबत सरकारने खबरदारी घेतली आहे. राज्यातील गरीब, दुर्बल घटकांना रेशन दुकानांवरुन तीन महिन्यांचे अन्नधान्य उपलब्ध करण्याचाही विचार सुरु आहे. राज्य सरकार जनतेची कुठलीही अडचण होऊ देणार नाही, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला.मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, घराबाहेर पडून ह्यकोरोनाह्णच्या संसगार्ला बळी पडू नये, हा संसर्ग आपल्या घरच्यांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने, हॉस्पिटल, वैद्यकीय सेवा आणि अत्यंत निकडीच्या वेळी वाहतुकसेवाही उपलब्ध केली जाईल. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्यासोबत आहे, परंतु आता प्रत्येकानं आपापल्या घरात थांबूनच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाचं पालन करावं, घरीच थांबावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.‘आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू ’संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही.आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका... कृपया घरीच रहा... अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणा?्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस