शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; उद्यापासून एसटी पूर्ण क्षमतेनं भरून धावणार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 20:32 IST

तोटा वाढत असल्यानं एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : शुक्रवारपासून एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने चालवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून प्रत्येकाने मास्क वापरणे व हात निर्जंतुक  करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

२० ऑगस्ट पासून राज्यभरात एसटी बसेस सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली होती. परंतु, एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवासी घेऊन प्रवास करणे बंधनकारक होते. याबाबत एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार राज्य शासनाने प्रत्येक प्रवासी व कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे व निर्जंतुक करणे  या अटीवर  बसेसच्या पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार १८ सप्टेंबर पासून सर्व एसटी बसेस पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळे बंदीच्या काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. सद्यस्थितीला दिवसभरात एसटीच्या सुमारे ५ हजार बसेस राज्यभरात धावत असून या बसेस द्वारे सरासरी ५ ते ६ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाल्यास, भविष्यात कमी बसेसद्वारे जास्तीत जास्त लोकांची ने-आण करणे शक्य होणार आहे.

अर्थात, प्रवासादरम्यान प्रत्येकाने मास्क लावणे व आपले हात निर्जंतुक करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर एसटीच्या सर्व बसेस वारंवार निर्जंतुक करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसचा प्राधान्याने विचार करावा , असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी