Coronavirus: Shiv Sena targets PM Narendra Modi Goverment over lockdown rajiv bajaj remarks | सरकार पाडायचं नियोजन करता, तसं टाळेबंदीचंही करायला हवं होतं; शिवसेनेचा मोदी-शाहांना टोला 

सरकार पाडायचं नियोजन करता, तसं टाळेबंदीचंही करायला हवं होतं; शिवसेनेचा मोदी-शाहांना टोला 

ठळक मुद्देराजीव बजाज यांनी मांडलेल्या मतांमुळे लॉकडाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे. नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतंही नियोजन नव्हतं. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे.अर्थव्यवस्थेस दिशा देण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनात सगळ्यांना जास्त रस आहे.

मुंबईः देशात लॉकडाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं आहे. राहुल गांधी यांनीही नेमकं तेच सांगितलं आणि आता राजीव बजाज यांनी मांडलेल्या मतांमुळे लॉकडाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे. नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतंही नियोजन नव्हतं. त्याचे दुष्परिणाम देश भोगत आहे. अशाप्रसंगी निर्णय एकांगी घेऊन चालत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन पावलं टाकावी लागतात, असं टीकास्त्र शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर सोडलं आहे.

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत 'धक्का' द्यायचाच म्हणून काँग्रेसचे आमदार विकत घ्यायचे किंवा फोडायचे, मध्य प्रदेशात ठरवून सरकार पाडायचं यासाठी जसं नियोजन केलं जातं तसं काटेकोर नियोजन टाळेबंदीबाबतही करणं गरजेचं होतं, असा टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी – अमित शाह जोडीला लगावला आहे. 

पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले. या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे, अशी कडक टीका ख्यातनाम उद्योगपती राजीव बजाज यांनी केली आहे. त्याच आधारे, ‘बजाज यांचा बॅण्ड’ अशा मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून शिवसेनेनं लॉकडाऊनचा पंचनामाच केला आहे.

>> महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 'पुन:श्च हरिओम'चा नारा दिला. त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्रामध्ये निर्बंध शिथिल झाले आहेत, पण 72 दिवसांच्या लॉकडाऊनचा पंचनामाही काही प्रमुख मंडळींनी सुरू केला आहे.

>> मोदी सरकारने देशात निर्घृण पद्धतीने लॉकडाऊन लागू केले, असं परखड मत राजीव बजाज यांनी मांडलंय. त्यांनी काहीच नवं सांगितलं नाही. देशातील अनेक उद्योजक, व्यापारी व नोकरदार वर्गास नेमके हेच सांगायचे होते, पण अनामिक भीतीने त्यांनी गप्प राहणे पसंत केले.

>> बजाज यांनी लॉक डाऊनसंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली. त्याबद्दल त्यांना 'ट्रोल' केले जाईल, देशविरोधी ठरवले जाईल, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील बजाज कुटुंबाचे योगदान व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेस ताकद देण्याची त्यांची धडपड देशाला माहीत आहे. त्यामुळे इतरांवर चालवले जाणारे 'हातखंडे' बजाज यांच्याबाबतीत चालणार नाहीत.

>> बजाज यांनी देशाच्याअर्थव्यवस्थेबाबत जे मुद्दे मांडले ते खोडून काढण्याची हिम्मत सरकारने दाखवायला हवी.

>> टाळेबंदी केली नसती तर विषाणू जास्त पसरला असता. रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढला असता हे खरे, पण नोटाबंदीप्रमाणेच टाळेबंदीबाबत कोणतेही नियोजन नव्हते.

>> लोकांना थेट मदत करा असे राहुल गांधी, रघुराम राजन व आता राजीव बजाज यांनीही सांगितले आहे, पण नियोजन व दिशा नाही. हे नियोजन आता प. बंगाल व बिहार विधानसभेच्या निवडणुकांत दिसून येईल. अर्थव्यवस्थेस दिशा देण्यापेक्षा राजकीय व्यवस्थापनात सगळ्यांना जास्त रस आहे.

>> राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत. सरकारचे उंबरठे झिजवून कंत्राटे मिळविणारे, बँकांची कर्जे बुडवून श्रीमंतीचा थाट मिरवणाऱ्यांपैकी ते नाहीत. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले, याला महत्त्व आहे.

>> देशाने राहुल गांधी यांचेही आभार मानलेच पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या टाळेबंदीत गांधी यांनी अनेकांना बोलते केले.

आणखी वाचाः

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच जनतेची इच्छा होती, पण धोका झाला'

केंद्र सरकारच्या नावाने ओरड करणारे राज्य सरकार स्वत:च्या खिशात हात घालणार की नाही : चंद्रकांत पाटील

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

संजय राऊत यांनीच मंत्र्याना सांगावे, 'हीच ती वेळ'; आशिष शेलार यांनी आभार मानत केली विनंती

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Shiv Sena targets PM Narendra Modi Goverment over lockdown rajiv bajaj remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.