'People wanted Fadnavis to be CM, but there was danger with us' jp nadda | 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच जनतेची इच्छा होती, पण धोका झाला'

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच जनतेची इच्छा होती, पण धोका झाला'

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र बनलेले चीनमधील वुहान शहर आता जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या शेवटच्या तीन रुग्णांनीही कोरोनावर मात केली असून, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या आकड्यांवर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनमध्ये कम्युनिष्टांचं सरकार असल्याने तेथील आकड्यांची गॅरंटी नसल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे. त्यासोबत, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरही जेपी नड्डा यांनी भाष्य केलंय. तसेच, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आमच्यासोबत धोका झाल्याचं नड्डा यांनी म्हटलंय. 

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये, सध्या देशातील परिस्थिती कोरोनावरील उपाय आणि केंद्र सरकारच्या वर्षाभरातील कार्याचा आढावा याबाबत आपलं मत व्यक्त केलं. आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा एकूण आकडा ८३ हजार ०२७ एवढा झाला असून, त्यापैकी ६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ७८ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, चीनमधील रुग्णांची आकडेवारी नो गॅरंटी असल्याचं नड्डा यांनी म्हटलंय. याच मुलाखतीत नड्डा यांना प्रादेशिक पक्षांकडून भाजपाला पराभवाचा सामना करावा लागतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, महाराष्ट्रात आमचोसोबत धोका झाल्याचं नड्डा यांनी म्हटलंय.


  
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत प्रादेशिक पक्षांकडून भाजपाला पराभूत व्हावं लागलं, याबद्दल नड्डा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबतच निवडणुकी लढवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात आमचा पराभव झाला असून आम्हीच जिंकलेलो आहोत. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झालाय, असे उत्तर नड्डा यांनी दिले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'People wanted Fadnavis to be CM, but there was danger with us' jp nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.