EMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील

By हेमंत बावकर | Published: April 1, 2020 04:32 PM2020-04-01T16:32:25+5:302020-04-01T16:38:47+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे.

CoronaVirus SBI, other PSU banks EMI moratorium offer has a catch; not worthy hrb | EMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील

EMI दिलासा ठरणार आतबट्ट्याचा; SBI सह अन्य बँकांचे 'गणित' पाहून डोळे पांढरे होतील

Next

मुंबई : रिझर्व्ह बँकेने लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे गृह, वाहन आदी कर्जदारांना तीन महिन्यांचा ईएमआय दिलासा देण्यास सांगितले होते. यावर मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिन्यांचा ईएमआय दिलासा दिला आहे. म्हणजेच तुमच्या कर्जाचा हप्ता घेण्यात येणार नाही. यामुळे कर्जदारांना हायसे वाटू लागले आहे. पण ही बातमी वाचल्यानंतर त्यांची झोपच उडणार आहे. 


सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. दास यांनी रिटेल आणि कृषी कर्जासह अन्य टर्म लोनचे हप्ते तीन महिने घेऊ नयेत असे आवाहन बँकांना केले होते. आता बँकांनी हे हप्ते मुदतवाढ करून भरण्याची सोय दिली आहे. 

पंजाब नॅशनल बँक, एसबीआय, बँक ऑफ बड़ोदा, युनिअन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आँध्र बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांनीही तीन महिने ईएमआय न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका दृष्टीने हा गरजवंतांसाठी दिलासा असला तरीही तो आतबट्ट्याचा व्यवहार ठरणार आहे. यामुळे ग्राहकांवर पश्चातापाची वेळ येणार आहे. कसे ते पहा. 


आरबीआयच्या सूचना सर्वात आधी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक अंमलात आणते. पण या बँकेनेच ही माहिती देऊन ईएमआय दिलासा घेऊ इच्छिणाऱ्यांची झोप उडविली आहे. एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. यावर त्यांनी हा ईएमआय दिलासा म्हणजेच न भरण्याची सूट दिल्याचे म्हटले आहे. तसेच ही योजना कशी लागू होईल याबाबतही सांगितले आहे. यामध्ये त्यांनी वाहन आणि गृह कर्ज अशी दोन उदाहरणे दिली आहेत. 

 

  • जर तुम्ही ६ लाखांचे वाहन कर्ज ५४ महिन्यांच्या मुदतीचे घेतले असेल आणि आरबीआयनुसार तीन महिन्यांचा दिलासा घेतला तर तुमच्या कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या काळातील एकूण कर्जाच्या रकमेवर तब्बल १९००० रुपये व्याज आकरले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम तुमच्या कारच्या हप्त्याच्या दीड पट असणार आहे. 
  • जर तुम्ही ३० लाखांचे १५ वर्षांच्या मुदतीचे गृहकर्ज घेतले असेल तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकून कर्जाच्या रकमेचे व्याजच २.३४ लाख रुपये भरावे लागणार आहे. हे व्याज म्हणजे तुमचे घराचे ८ हप्ते असणार आहे.

एकूणच काय तर तुम्ही तीन हप्ते टाळण्यासाठी किंवा सूट घेण्याचा हव्यास धरलात तर वाहनाचे दीड महिन्याचाच EMI दिलासा मिळणार आहे. तर घराचे कर्ज असलेल्यांना तर तीन महिन्यांचे हप्ते आणि व्याजाचे ८ महिन्यांचे हप्ते असे ११ हप्ते जादा भरावे लागणार आहेत. 

हा  EMI दिलासा कोणी घ्यावा? 
गणित एकदम सोपे आहे. यामुळे जर गरज असले, तुमची नोकरी, रोजगार गेला असेल तरच EMI दिलाश्याचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. अन्यथा हा व्यवहार आतबट्ट्याचाच ठरणार आहे. 


फायदे कोणते? 
ईएमआय दिसासा देण्याचे दोन फायदे आहेत. जर लॉकडाऊन काळात हप्ते भरण्याची ताकद नसेल तर तेवढा दिलासा मिळणार आहे. दुसरा म्हणजे हप्ता चुकला तरीही सिबिल स्कोअरवर त्याची नोंद होणार नाही. हा प्रकार केवळ एसबीआयच नाही तर अन्य बँकांकडूनही केला जाणार आहे. यामुळे जर गरज नसेल तर तीन महिन्यांचा दिलासा न घेणेच परवडणारे आहे. 

EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Web Title: CoronaVirus SBI, other PSU banks EMI moratorium offer has a catch; not worthy hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.