शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:26 AM

थंड वातावरणात हा व्हायरस जास्त काळ राहतो म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे. 

ठळक मुद्देराज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वरून 63 वर गेली असून, मुंबई 10 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांवर राजेश टोपेंनी मोलाची सूचना केली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयात एअर कंडिशन बंद करण्याचं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं असून, शासकीय कार्यालयात एसी वापरू नये

मुंबईः राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वरून 63 वर गेली असून, मुंबई 10 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांवर राजेश टोपेंनी जनतेला मोलाची सूचना केली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयात एअर कंडिशन बंद करण्याचं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं असून, शासकीय कार्यालयात एसी वापरू नये, जमल्यास कमीत कमी वापरावा असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. थंड वातावरणात हा व्हायरस जास्त काळ राहतो म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले, शरद पवारांनी तातडीने केंद्र सरकार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली आहे, मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करून द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे. राज्यात कोरोनानं 63 जण संक्रमित झाले आहेत. काल संख्या 52 होती आता ती थेट 63 झाली आहे. या नवीन रुग्णांत  10 मुंबईचे आहेत, एक पुण्याचा आहे. परदेशातून आलेले लोक 8 आहेत. तीन हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. काल पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत  झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टेस्टिंगची सुविधा वाढवून देण्याची मागणी केली आहे. तोच मुद्दा मी पवारसाहेबांना सांगितला होता, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.पवारसाहेब केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोलले आहेत. कुठल्याही परिस्थितीत राज्यातील टेस्टिंग लॅब वाढल्याच पाहिजेत. महाराष्ट्रातल्या रुग्णालयात आम्ही टेस्टिंग सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आयसीएमआरआयच्या नियमावलीत आम्ही बसत असू, तरच आम्हाला परवानगी द्या, असंसुद्धा आम्ही डॉ. हर्षवर्धन यांना सांगितलं आहे. आम्ही तुमचे सर्व नियम पाळू, फक्त आम्हाला परवानगी द्या आणि किट्स द्या, त्याला मात्र तुम्ही नाही म्हणू नका, असा केंद्राकडे आग्रह धरलेला आहे. पूर्वी फक्त कोरोनाच्या तपासणी करण्यासाठी तीन प्रयोगशाळा होत्या, आता जवळपास त्यांची संख्या सातवर गेलेली आहे. या टेस्टिंग लॅबची संख्या 12 ते 15पर्यंत व्हायला हवी.काल मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांतील दुकानं बंद केल्यानं इथले कामगार, विद्यार्थी हे सगळेजण आपापल्या घरी जाण्यासाठी रेल्वेमध्ये गर्दी करत आहेत. रेल्वेच्या तिकीटघरात लांबच लांब रांगा लावून तिकीट काढण्याचं प्रयत्न करत आहेत. रेल्वे मंत्र्यांना सांगून जास्तीच्या रेल्वे उपलब्ध करून देण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.त्याप्रमाणे मुख्यमंत्री रेल्वेमंत्र्यांशी बोलणार आहेत. पवार साहेबांनासुद्धा याची माहिती दिलेली आहे. लोकल ट्रेन बंद केली पाहिजे, असं डॉ. हर्षवर्धन यांचं मत आहे. पण त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही जीवनावश्यक सुविधाच सुरू ठेवलेल्या आहेत, असंही राजेश टोेपेंनी स्पष्ट केलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

Web Title: Coronavirus : coronavirus quarantined man marries 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस