शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 18:59 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देमुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावेजिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेतअशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे

मुंबई - राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण मुंबई, पुण्यात अडकून पडले आहेत. यामध्ये कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली तरी कोकणी चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत अद्याप तरी संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबाबत राज्य सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावे, असा सल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊन यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात राहत असलेल्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान आपल्याला गावी जाऊ द्यावे अशी मागणी मुंबईकर चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप तरी स्पष्ट निर्णय होऊ शकलेला नाही. त्यावरून नितेश राणे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

 याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की,’’राज्य सरकारने मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांबद्दल एकदाच काय ते धोरण निश्चित करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे.’’

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडलेले नाहीत. तसेच जे रुग्ण सापडले आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई आणि आसपासच्या शहरांतून कोकणात आलेले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईkonkanकोकणNitesh Raneनीतेश राणे Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार