CoronaVirus News : Video: कोरोनाशी मुकाबला करतानाही अशोक चव्हाण 'अॅक्टिव्ह'; हॉस्पिटलमधून केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:23 IST2020-05-28T16:19:09+5:302020-05-28T16:23:36+5:30
अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच एक व्हिडीओ शेअर केला असून, काँग्रेसच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

CoronaVirus News : Video: कोरोनाशी मुकाबला करतानाही अशोक चव्हाण 'अॅक्टिव्ह'; हॉस्पिटलमधून केला व्हिडीओ
मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नांदेडहून पुढील उपचारासाठी मुंबईतल्या ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाशी मुकाबला करत असतानाही अशोक चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह आहेत. अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच एक व्हिडीओ शेअर केला असून, काँग्रेसच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
व्हिडीओत ते म्हणाले, मित्र हो नमस्कार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वढेरा यांनी जी स्पीक अप इंडियाची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यात मी सहभाग नोंदवत आहे. कोट्यवधी देशवासीयांचे जे मनोगत आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी मुंबईतल्या एका हॉस्पिटलमधून कोरोनाशी लढा देत असताना स्पीक अप इंडिया या मोहिमेमध्ये सहभागी होत असल्याचं जाहीर करतोय.
मला केंद्र सरकारला जाणीव करून द्यायची आहे आणि विनंतीही करायची आहे की, आज या महामारीचा मुकाबला करत असताना सर्वात जास्त फटका जर कोणाला बसला असेल तर तो सामान्य माणसाला, शेतकरी, शेतमजुराला आणि गरिबातल्या गरीब माणसाला बसला आहे. जे छोटे आणि मध्यम उद्योग आहेत, त्यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षानं ज्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्यात मी माझा सहभाग नोंदवत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.कोरोनामुळे हतबल झालेल्या देशातील कोट्यवधी नागरिकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी @INCIndia ने #SpeakUPIndia अभियान राबवले आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 28, 2020
मी रूग्णालयातूनच या अभियानात सहभागी होत असून, केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी माझी विनंती आहे. pic.twitter.com/vytabwTkpu
गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री अशोक चव्हाण मुंबईहून नांदेडला परतले होते. मात्र त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुगणालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ते अॅम्बुलन्समधून मुंबईकडे रवाना झाले. ते रात्री उशिरा मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून त्यांना मुंबईला हलविण्यात आल्याचे त्यांच्या समवेत असलेले डॉ. अंकुश देवसरकर यांनी सांगितले.
CoronaVirus News: ...अन् फडणवीस पुन्हा आले; ठाकरे सरकारच्या 'त्या' दाव्यांची चिरफाड करून गेले
CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा
भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश