CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:28 AM2020-07-18T02:28:43+5:302020-07-18T02:29:06+5:30

केवळ १७ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे़ जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १६ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे.

CoronaVirus News: Nanded in Marathwada records highest death rate, situation is similar to Mumbai | CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती

CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती

Next

नांदेड : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नांदेडचा जिल्ह्याचा मृत्यूदर गुरुवारपर्यंत सर्वाधिक म्हणजेच ५़३८ एवढा नोंदला आहे़
केवळ १७ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे़ जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १६ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे़ तर जूनच्या अखेरीस जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाला होता़ जुलैच्या मध्यापर्यंत हा आकडा ४० वर पोहचला आहे़ महिनाभरातच नांदेडात २६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़
औरंगाबादमध्ये गुरुवारी रात्रीपर्यंत ९ हजार ७४४ रुग्ण आढळून आले असून ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे़ औरंगाबादचा मृत्यू दर ३़८६ एवढा आहे़ जालन्यात १ हजार १८२ रुग्ण तर ५१ जणांचा मृत्यू़ मृत्यूदर ४़३१, हिंगोली ३७३ बाधित रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे़ मृत्यू दर ०़८०, परभणीत ३४५ रुग्ण तर १० जणांचा मृत्यू़ मृत्यू दर २़८९, लातूरात ८९६ पॉझिटिव्ह रुग्ण तर ४३ जणांचा मृत्यू़ मृत्यूदर ४़७९, उस्मानाबाद ४७० रुग्ण सापडले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे़ मृत्यूदर ४़४६ आहे. बीड जिल्ह्यात २८० बाधित असून १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर ४़२८ एवढा आहे़ नांदेडमधील मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व साधनसामुग्रीसह आम्ही सज्ज आहोत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus News: Nanded in Marathwada records highest death rate, situation is similar to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.