शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन; मांडल्या 'या' सूचना... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 15:18 IST

CoronaVirus News : मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भातील निवेदन आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक निवेदन देण्यात आले आहे.

मुंबई : कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात काही सूचना मांडल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. 

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भातील निवेदन आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वेळोवेळी पक्षाच्यावतीने जनहितार्थ अनेक गोष्टी सुचवित आहोत व त्यातील अनेक सूचना आपण प्रत्यक्षात आणल्याबद्दल तुमचे आभार. आज ही या निवेदनात काही सूचना तुमच्यासमोर मांडत आहोत, त्याचा आपण अंमलबजावणीसाठी विचार करू शकता, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. 

राज्यभर कोरोनाच्या टेस्ट या सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याद्वारे करून घेतल्या जात आहेत, परंतु अनेकदा ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, असे नागरिक सुद्धा स्वतःहून त्यांच्या व त्यांच्या निकटवर्तीयांच्या सुरक्षेसाठी अशा टेस्ट करू इच्छितात. मात्र, त्या स्थानिक संस्थेच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करता येत नाही. कारण कोरोनाविषयी सर्व माहिती एकत्रितपणे संकलित करण्यासाठी बहुदा हा नियम असावा. परंतु हा नियम शिथिल करावा व ज्यांना लक्षणे नाहीत. मात्र, टेस्ट करायची आहे अशांना आधार कार्ड व इतर माहितीच्या आधारे ही परवानगी द्यावी, अशी सूचना बाळा नांदगावकर यांनी मांडली आहे.

याचबरोबर, टेस्टिंग लॅब ही टेस्ट करून आवश्यक माहिती सरकारकडे ऑनलाइन पुरवेल, यामुळे टेस्टसाठी प्रिस्क्रिप्शन घेण्याची अडचण कमी होईल व टेस्टची संख्या ही वाढेल व सरकारकडे टेस्ट केलेल्यांची सर्व माहिती देखील जमा होईल, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. तसेच, काही केसेसमध्ये प्लाझ्मा थेरपी ही उपयोगी पडत आहे, परंतु प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा  दाते सापडणे थोडे कठीण आहे. आत्ता लगेच प्लाझ्मा बँक बनविणे ही अवघड आहे. परंतु कोरोनामुक्त झालेले पेशंट जर त्यांच्या संमतीने प्लाझ्मा देण्यास तयार असतील तर त्यांची माहिती संकलित करून ठेवावी, जेणेकरून गरजूंना अशा दात्यांना शोधणे सोपे जाईल, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

आणखी बातम्या...

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेचा 'देसी जुगाड'; पाहून तुम्हीही कराल तोंडभरून कौतुक!

मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू

CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन

चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात

Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

टॅग्स :MNSमनसेRajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई