CoronaVirus News: Maharashtra reports 5,965 new COVID-19 cases,3,937 recoveries, and 75 deaths today, as per the State Health Department | CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

ठळक मुद्देराज्यात गेल्या २४ तासांमध्ये ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज थोडीशी घट दिसून येत आहे.  दिवसभरात राज्यात ५ हजार ९६५  नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ लाख १४ हजार ५१५ इतकी झाली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आज ५ हजार ९६५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज दिवसभरात राज्यभरात ३ हजार ९३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख ७६ हजार ५६४ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९२.४ % इतके झाले आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७ लाख २२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख १४ हजार ५१५ (१६.९२ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या प्रत्यक्षात ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहे. राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला
कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे.  शुक्रवारी यासंदर्भातील आदेश राज्यातील ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाऊन असणार आहे. 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७५८ रुग्णे सापडले
जिल्ह्यात कोरोनाचे ७५८ रुग्ण शनिवारी सापडले असून नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात आता दोन लाख २७ हजार ७९९ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ६६९ मृत्यूची नोंद झालेली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Maharashtra reports 5,965 new COVID-19 cases,3,937 recoveries, and 75 deaths today, as per the State Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.