CoronaVirus News: 11 thousand 88 patients infected with corona in the last 24 hours in the Maharashtra | CoronaVirus News : राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे रुग्ण

CoronaVirus News : राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे रुग्ण

ठळक मुद्दे सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबई:  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के इतका आहे. 

याचबरोबर, आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: 11 thousand 88 patients infected with corona in the last 24 hours in the Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.