शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कुटुंबातील 'या' कोरोना योद्ध्याचा रोहित पवारांनी केला खास सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 08:50 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबातही एक कोरोना योद्धा आहे.

मुंबई - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात शनिवारी 2940 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या 65 हजार 168 इतकी झाली आहे. यापैकी बरे झालेले आणि मृतांचा आकडा वगळता राज्यातील 34 हजार 881 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. कोरोना योद्ध्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबातही एक कोरोना योद्धा आहे. रोहित यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. कुटुंबातील कोरोना योद्ध्याचा त्यांनी खास सन्मान केला आहे. राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

रोहित पवार यांच्या पत्नी कुंती यांची बहीण शिल्पा मगर या डॉक्टर आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्या रुग्णांची सेवा करत आहेत. "कोरोनाशी लढणारा एक योद्धा आमच्याही कुटुंबात आहे तो म्हणजे माझ्या सौ. कुंती यांची बहीण डॉ. शिल्पा मगर. नवले हॉस्पिटलमध्ये त्या कोरोना पेशंटची सेवा करतायेत. आज आवर्जून त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला. राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे" असं ट्विट रोहित यांनी केलं आहे. 

महाराष्ट्रातील रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.3 दिवस होता तो आता 17.5 दिवस झाला आहे. देशाचा रुग्णवाढीचा वेग सध्या 17.1 दिवस आहे, तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.07 टक्के आहे. मृत्यूदर 3.37 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 660 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून 35, 420 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील आजच्या 99 मृतांपैकी सर्वाधिक 54 मुंबईतील आहेत. याशिवाय, वसई-विरार 7, पनवेल 7, ठाणे 6, रायगड 3, नवी मुंबई 2, कल्याण-डोंबिवली 2 असे ठाणे आरोग्य मंडळात 81 मृत्यू आहेत, तर नाशिक मंडळात जळगाव येथील तीन मृतांची नोंद आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ

चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक

CoronaVirus News : लढ्याला यश! जगातली सर्वात जलद, स्वस्त टेस्ट किट तयार, फक्त 1 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार?

CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर