शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: विमान प्रवाशांसाठी 'अशा' आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाइडलाइन्स, 14 दिवस रहावे लागणार होम क्वारनटाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 21:31 IST

कोरोना संकट निश्चितपणे लवकर जाणार नाही. मात्र, आहे ती परिस्थितीच सामान्य असल्याचे मानत नवी सुरूवात केली जात आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या राज्यांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम निर्धारित केले आहेत.प्रवासी जर एखाद्या कार्यालयात काम करत असेल, तर स्थानिक प्रशासन होम आयसोलेशनमध्ये काही सूट देऊ शकते. सर्वच विमानतळांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.

मुंबई : देशातील सर्वच विमानतळांवर आज विमाने सुरू करण्यात आली. सर्वच विमानतळांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. कोरोना संकट निश्चितपणे लवकर जाणार नाही. मात्र, आहे ती परिस्थितीच सामान्य असल्याचे मानत नवी सुरूवात केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर, दुसऱ्या राज्यांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम निर्धारित केले आहेत. येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होईल आणि डाव्या हातावर शिक्का मारला जाईल. तसेच त्यांच्यासाठी 14 दिनसांचे होम आयसोलेशन अनिवार्य असेल.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

प्रवासी जर एखाद्या कार्यालयात काम करत असेल, तर स्थानिक प्रशासन होम आयसोलेशनमध्ये काही सूट देऊ शकते. तसेच आवश्यकतांचा विचार करूनही प्रशासन सूट देण्यावर विचार करू शकते.

जर एखादा प्रवासी महाराष्ट्रात आला आणि तो एक आठवड्यातच परत जाणार असेल तर, त्याला होम आयसोलेशनमध्ये राहणे अनिवार्य नाही. मात्र, त्यांना यासंदर्भात राज्य सरकारला माहिती द्यावी लागेल. तसेच, अशा व्यक्तीला कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्याची परवानगी नसेल.

 CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये म्हणण्यात आले आहे, की एखादा प्रवासी रेसिडेंशल भागात राहण्यासाठी जात नसेल, तर त्याला आपल्या राहण्याच्या ठिकाणासंदर्भात माहिती द्यावी लागेल. जेनेकरून संबंधित ठिकाणाचे सॅनिटायझेशन करता येईल. 

मोदी सरकारचे शक्तीशाली चीनला 30 दिवसांत 3 मोठे धक्के, संपूर्ण जगच गेलंय 'ड्रॅगन'च्या विरोधात

SOP कोरोना लक्षण असलेल्या रुग्णांसाठी लागू असेल. एअरपोर्टपर्यंत रस्त्याने जाण्याची परवानगी असेल. मात्र, प्रवाशांना कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्याची अथवा तेथून बाहेर जाण्याची परवानगी नसेल. प्रवाशाला रेडझोनमधून बाहेर जाण्यासाठी आधीच परवानगी घ्यावी लागेल.

CoronaVirus News : चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जगातील टॉप 10 देशांमध्ये पोहोचला भारत, इराणला टाकले मागे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रairplaneविमान