शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

CoronaVirus News : पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी अजित पवारांनी कसली कंबर, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 23:58 IST

नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई सोबत लढू आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असे पवार म्हणाले.

मुंबई - पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशाने काम करणार असून कंटेन्मेंट झोनमध्ये घराघरात जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी ठरलेल्या वेळेत पार पाडली जाणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, तसेच त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात सायंकाळच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमाने एक विशेष  बैठक घेण्यात आली होती. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 

या बैठकीच केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सहभागी झाले होते. याशिवाय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, आदी अधिकाऱ्यांनीही बैठकीत सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीही पुण्यातील एकंदरिक कोरोना स्थिती आणि उपाय योजनांसंदर्भात माहिती दिली.

पुणे जिल्ह्यातील स्थितीसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, "पुण्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्याही वाढल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याला भेट देणार आहेत." 

यावेळी, विभागीय आयुक्त आणि जिल्ह्याधिकारी, तसेच महापालिका आयुक्त आणि काही मुख्य अधिकारी नियमितपणे पत्रकार परिषद घेतील. आपण नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई सोबत लढू आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असेही अजित पवार बैठकीदरम्यान म्हणाले. 

या बौठकीत, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सहकार्य मिळत असल्याचे सांगत, राज्य सरकाने केंद्राकडे मागणी केल्याप्रमाणे व्हेन्टीलेटर्स मिळावेत, प्लाझ्मा थेरेपीसंदर्भातील त्वरित मंजुरी मिळावी, जीवरक्षक औषधे उपलब्ध व्हावीत, पुण्यातील रुग्णालयातील डॉक्टरांवर येणारा ताण कमी व्हावा यासाठी संरक्षण दलाच्या रुग्णालयांतील डॉक्टरांचे सहाय्य मिळावे, यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लक्ष घालावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या -

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र