CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात 47 हजार 827 नवे रुग्ण, तर मृतांचा आकडा 200 पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 22:45 IST2021-04-02T22:44:46+5:302021-04-02T22:45:21+5:30
CoronaVirus in Maharashtra : आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.

CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात 47 हजार 827 नवे रुग्ण, तर मृतांचा आकडा 200 पार
मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात 47 हजार 827 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 47,827 new COVID19 cases and 202 deaths today; case tally 29,04,076)
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात शुक्रवारी राज्यात 47 हजार 827 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 89 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.62 टक्के झाले आहे. आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 21 लाख 1 हजार 999 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 19 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 47,827 new COVID19 cases and 202 deaths today; case tally 29,04,076 pic.twitter.com/XUxZmaoLLv
— ANI (@ANI) April 2, 2021
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक ८८३२ रुग्ण, २० रुग्णांचा मृत्यू
कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी मुंबईत झाली. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 2, 2021
२ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ८८३२
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ५,३५२
बरे झालेले एकूण रुग्ण- ३,६१,०४३
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८४%
एकूण सक्रिय रुग्ण- ५८,४५५
दुप्पटीचा दर- ४६ दिवस
कोविड वाढीचा दर (२६ मार्च-१ एप्रिल)- १.४६%#NaToCorona