शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

coronavirus: कांदा उत्पादकांच्या मुळावर लॉकडाउन! शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 07:27 IST

कोरोना रुग्ण आढळल्याने आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ मे पासून लिलाव बेमुदत बंद करण्यात आले आहेत.

- योगेश बिडवई  मुंबई : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनचा कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला असून देशभरात मागणीत घट झाल्याने दीड महिन्यात कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहेत. त्यातच कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यभरातील बाजार समित्यांचे कामकाजही प्रभावित झाल्याने खरेदीत अडथळे येत आहेत. एकप्रकारे लॉकडाउन कांद्याच्या मुळावर आले आहे.कोरोना रुग्ण आढळल्याने आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ मे पासून लिलाव बेमुदत बंद करण्यात आले आहेत. २४ मार्चला देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यापूर्वी २३ मार्चला लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे क्विंटलमागे सर्वसाधारण भाव १,२५० रुपये होते. ते ६ मे रोजी थेट निम्म्यावर म्हणजे ६३० रुपयांवर आले. त्यातच कोरोनामुळे ११ मे पासून सात दिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. त्याचाही शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.मागील वर्षी राज्यात ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीत यंदा वाढ होऊन कांद्याचे क्षेत्र तब्बल ५ लाख ८० हजार ३१९ हेक्टर झाले आहे. थंडी व पाणी उपलब्ध झाल्याने पीकही जोमदार आले आहे, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली. तर साठवणूक केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेला कांदा मातीमोल भावात विकावा लागणार असल्याची खंत नगर जिल्ह्यातील शेतकरी गुलाबराव डेरे यांनी व्यक्त केली.देशात सध्या कांद्याला मोठी मागणी नसली तरी दैनंदिन कांदा पॅकिंग व लोडिंग करण्यासाठी मजूर मिळत नसल्याची माहिती लासलगावचे व्यापारी नितीन जैन यांनी दिली.मध्य प्रदेश, उत्तर भारत तसेच दक्षिणेतील राज्यात यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने तेथे कांद्याला मागणी नाही, असे व्यापारी नवीनकुमार सिंहयांनी सांगितले. त्यात बांग्लादेशात माल जात आहे, ते दिलासादायक आहे.केंद्र सरकारने १ लाख टन कांदा खरेदी करावाकेंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यंदा नाफेडमार्फत एक लाख टन कांदा खरेदीचे जानेवारीत नियोजन केले होते. मात्र नंतर केवळ ५० हजार टन खरेदीला नाफेडला परवानगी दिली. केंद्र सरकारने आणखी ५० हजार टन कांदा खरेदी करण्याची गरज आहे.- नानासाहेब पाटील,संचालक, नाफेड

टॅग्स :onionकांदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक