शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राज्यात आता दोनच झोन, नवी नियमावली जाहीर; पाहा, तुमचा जिल्हा कोणत्या झाेनमध्ये येतो? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 5:13 AM

CoronaVirus Lockdown Guidelines in Maharashtra : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेला संबोधित करताना रेड झोन मधील निर्बंध कोणत्याही परिस्थितीत शिथिल करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते.

मुंबई : राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून, राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मंगळवारी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्यात केवळ दोनच झोन, अर्थात रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. मुंबईसह पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, जळगाव, अकोला, अमरावती हे भाग रेड झोनमध्ये असतील. उर्वरित जिल्हे नॉन रेड झोनमध्ये असणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेला संबोधित करताना रेड झोन मधील निर्बंध कोणत्याही परिस्थितीत शिथिल करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. रेड झोनमधील शहरांची यादी जाहीर केली आहे, तर उर्वरित सर्व प्रदेश (आॅरेंज आणि ग्रीन झोनसह) नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट केला आहे. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे हे दोन्ही झोनमध्ये बंदच राहतील. मात्र, आॅनलाईन आणि दूरस्थ शिक्षण सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच हॉटेल, मॉल, प्रार्थना स्थळेदेखील राज्यभर बंद राहतील. मेट्रो रेल्वेसेवा, तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंदच राहील. मात्र, या काळात देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू राहील. रेड झोनमध्ये खासगी कार्यालये पूर्णत: बंद तर शासकीय कार्यालयांत फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.रेड झोनमधील निर्बंधदारुची दुकाने, आंतरजिल्हा बस वाहतूक, खाजगी बांधकाम, खाजगी कार्यालये, सलून, स्पा, टॅक्सी, आॅटोरिक्षा, कॅब, स्टेडियम या गोष्टी रेड झोनमध्ये बंद असतील. तर उर्वरित ठिकाणी चालू असतील.रेड झोनमधील निर्बंधदारुची दुकाने, आंतरजिल्हा बस वाहतूक, खाजगी बांधकाम, खाजगी कार्यालये, सलून, स्पा, टॅक्सी, आॅटोरिक्षा, कॅब, स्टेडियम या गोष्टी रेड झोनमध्ये बंद असतील. तर उर्वरित ठिकाणी चालू असतील.रेड झोनमध्येया सेवा सुरू होतील(कंटेन्मेंट भाग वगळून)- घरपोच दारू पोहोचवण्यास परवानगी- अत्यावश्यक सेवेसाठी चारचाकी वाहन (एक चालक आणि दोन प्रवासी)- दुचाकी वाहनावर एकाच व्यक्तीस परवानगी- मर्यादित एकल दुकाने, धान्य, भाजीपाला दुकाने- ई-कॉमर्सच्या माध्यमातून सर्व साहित्य मागवता येईल, कुरिअर आणि पोस्ट सेवादेखील चालू असेल, हॉटेलमधून खाद्यपदार्थ मागवण्यास परवानगी, नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालये चालू राहतील. -आणखी वृत्त/राज्यसर्वांसाठी हे बंधनकारक- सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंन्सचे पालन- खासगी कार्यालयांत शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध- लग्न समारंभासाठी कमाल ५० जणांची उपस्थिती- अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक व्यक्ती नको. कार्यालयांत थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर बंधनकारक.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस