शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लग्नाची वरात, बाईकवरून घरात; लॉकडाऊनमध्येच संपन्न झाला हटके विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:08 IST

लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत.

ठळक मुद्देजरा हटके विवाह सोहळा नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळीक एका गावात संपन्न झालावराती, बँडबाजा, पै पाहुणे, मानपान, जेवणावळी असला पारंपरिक लग्नातील कुठलाच थाटमाट न करता हा विवाह सोहळा पार पडला. विवाह संपन्न झाल्यानंतर वर वधूला घेऊन बाईकवरूनच वरात काढत घर गाठले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - ऐन लगिनसराईच्या मोसमात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने अनेक विवाहेच्छुकांचे विवाह रखडले आहेत, तर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत. असाच एक जरा हटके विवाह सोहळा नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळीक एका गावात संपन्न झाला. 

वराती, बँडबाजा, पै पाहुणे, मानपान, जेवणावळी असला पारंपरिक लग्नातील कुठलाच थाटमाट न करता हा विवाह सोहळा पार पडला. वधू-वर, भटजी आणि वराचा एक मित्र अशा केवळ चार जणांच्या उपस्थितीत हे शुभमंगल संपन्न झाले. विशेष बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला वधु-वरांचे आई-वडीलसुद्धा उपस्थित नव्हते. 

 

मिळालेल्या माहितीनुसार इन्सुली गावातील स्वप्निल नाईक याचा विवाह सातार्डा येथील रसिका पेडणेकर हिच्यासोबत काही दिवसांपूर्वी ठरला होता. मात्र त्याचदरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्याने लग्नात विघ्न आले होते. अखेरीस या परिस्थितीतून मार्ग काढत वधु-वराकडच्या मंडळींनी विवाह साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरवले. तसेच या विवाहसोहळ्यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांची परवानगी घेण्यात आली. शासनाच्या नियमांचे पालन करून विवाहसोहळा पार पडल्यास  आपली काहीच हरकत नसेल, अशी सूचना तहसीलदारांनी केली होती.अखेरीस वधू-वर, विवाह लावून देणारे भटजी आणि वराचा एक मित्र अशा चार जणांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. त्यानंतर वर वधूला घेऊन बाईकवरूनच वरात काढत घर गाठले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्नSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्गJara hatkeजरा हटके