शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

coronavirus: शक्य असल्यास सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 1:09 AM

सध्या सरकारी रुग्णालयात पहिल्या ५ वर्षांपर्यंतच्या मोफत लसीकरणासाठी जाणे अवघड झाले आहे. एक तर यातील काही शासकीय रुग्णालये ही कोविड हॉस्पिटल्स आहेत. तर ब्ऱ्याच ठिकाणी संशयित तपासले जातात.

सध्या सरकारी रुग्णालयात पहिल्या ५ वर्षांपर्यंतच्या मोफत लसीकरणासाठी जाणे अवघड झाले आहे. एक तर यातील काही शासकीय रुग्णालये ही कोविड हॉस्पिटल्स आहेत. तर ब्ऱ्याच ठिकाणी संशयित तपासले जातात. याशिवाय सरकारी आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहेत. यामुळे नियमित लसीकरण ३ ते ४ महिने शक्यतो खाजगी रुग्णालयात घ्यायला हरकत नाही. ज्या लशी सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात, त्या खासगी रुग्णालयात अत्यंत स्वस्त आहेत.गोवर, बीसीजी, एमएमआर स्वस्त आहेतच पण पेन्टा म्हणजे ट्रिपल, मेंदूज्वर, कावीळ ही लस ३९५ रुपये एवढ्या किमतीची आहे. याचे दीड, अडीच, साडेतीन व अठरा महिने असे ४ डोस असतात. खासगी प्रॅक्टीस करणाºया बालरोगतज्ज्ञांनी यासाठी पुढील काही महिने तरी केवळ लशीची मूळ किंमतच आकारावी. त्यावर आपले कन्सल्टेशन चार्जेस व इंजेक्शन देण्याचे चार्जेस घेऊ नये. यामुळे सरकारी रुग्णालयातील कामाचा ताण तर कमी होईलच, शिवाय सरकारी रुग्णालयात जाऊन सर्दी , खोकला तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका काही अंशी कमी होईल. अजून एक मधला मार्ग काढला जाऊ शकतो. सरकारी रुग्णालयात असलेल्या लशींचा स्टॉक सरकारी रूग्णालयाने बालरोगतज्ज्ञांकडे द्यावा. त्या लशी बालरोगतज्ज्ञांनी टोचून द्याव्या. या मोफत लशी खाजगी रुग्णालयात मिळणार आहेत, या जनजागृतीसाठी आशा सेविकांची मदत घेता येईल. यामुळे लसीकरणाचे प्रमाणही वाढेल.- डॉ. अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल