शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Coronavirus: कोरोनाची ग्रामीण भागातही धडक; नगरमध्ये एक रुग्ण सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:21 PM

राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या अठरावर पोहोचली

ठळक मुद्देशहरी भागांपाठोपाठ कोरोनाची ग्रामीण भागात धडकअहमदनगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलाराज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या अठरावर

अहमदनगर: शहरी भागांपाठोपाठ कोरोनानं ग्रामीण भागात धडक दिली आहे. अहमदनगरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या अठरावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी ४० जणांचा एक गट दुबईहून परतला होता. त्यात नगरमधल्या एका व्यक्तीचा समावेश होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातल्या ४० जणांचा एक गट मध्यंतरी दुबईला गेला होता. काही दिवसांपूर्वीच हा गट मायदेशी परतला. या गटातल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातल्या एकाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.नगरमधल्या कोरोना रुग्णाची प्रकृती स्थिर असून अद्याप सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं आढळून आलेली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. नगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे. कोरोनाची बाधा झालेले सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात १० जणांवर उपचार सुरू आहेत. नागपूर, मुंबई कोरोनाचे प्रत्येकी ३ रुग्ण आढळले असून ठाण्यात एक रुग्ण सापडला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस