शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 14:26 IST

सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

जळगाव - कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपाने  आज उद्धव ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले.

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी कुटुंबीयांसह आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई खासदार रक्षाताई खडसे यासुद्धा उपस्थित होत्या. उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, असा टोला खडसे यांनी यावेळी बॅनरच्या माध्यमातून लगावला.

खासदार रक्षाताई खडसे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र घरात, अशी टीका त्यांनी केली आहे. खडसे आज या आंदोलनात सहभागी झाल्याने पक्षावर नाराज असले तरी ते पक्षासोबत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

दरम्यान, भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी, मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन केले.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं आहे. राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशातील २० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाPoliticsराजकारणJalgaonजळगाव