शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

CoronaVirus : कोरोनाच्या संकटात काँग्रेसचा मदतीचा हात; थोरातांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 4:03 PM

गरीब जनतेला, हातावर पोट असणा-या कामगारांना, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई: कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्यामुळे काँग्रेस पक्षही लोकांच्या मदतीसाठी सक्रिय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांना सर्व पातळ्यांवर लोकांना मदत करण्यासाठी पत्र पाठवून आवाहन केल्यानंतर आज त्यांनी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते, जिल्हाध्यक्ष, आमदार व पदाधिका-यांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधला. गरीब जनतेला, हातावर पोट असणा-या कामगारांना, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे.थोरात म्हणाले, अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची काँग्रेसची परंपरा आहे. राज्याच्या. प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला मदत करण्यास काँग्रेस सेवादलातर्फे ५० प्रशिक्षित कार्यकर्ते तयार आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून १० हजार बाटल्या रक्त जमा करण्यात येत आहे. तसेच युवक काँग्रेस मार्फत प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे गरजूंपर्यंत पोहोचवली पाहिजेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सोशल डिस्टन्शिंग आणि सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करत हे काम करावे. ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांच्या घरात अन्नधान्य शिल्लक नाही ज्यांना जेवणाची भ्रांत आहे अशा लोकांची संख्या मोठी आहे. आपल्या भागातील अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना घरपोच जेवण किंवा अन्नधान्य पोहोचविले पाहिजे. एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन थोरात यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटात राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आमदार कुणाल पाटील आमदार झिशान सिद्दिकी यांनी अत्यंत चांगले काम केल्याचे सांगून प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, परिस्थिती गंभीर आहे अडचणींच्या काळात लोकांना मदत कशी करता येईल ते पहावे. जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून समन्वय ठेवावा. सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे. मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बांधकाम मजुरांना महामंडळामार्फत रो़ख रक्कम तात्काळ मिळवून देण्याबाबत प्रयत्न करावेत. गरिब लोकांचे हाल होत आहेत त्यांना मदत पोहोचवली पाहिजे, विविध सामाजिक संस्थांशी समन्वय साधून प्रभावीपणे मदतकार्य करावे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाचे हे संकट शतकातले सर्वात मोठे संकट आहे. विमानवाहतूक बंद करेपर्यंत १ जानेवारीपासून १२ लाखांपेक्षा जास्त प्रवासी परदेशातून आले आहेत. कोरोनाची लक्षणे १५ दिवस दिसत नसल्याने लोक क्वारंटाईन करून घेत नाहीत. आपल्या आसपास कोणी परदेशातून आलेले असल्याची माहीती असल्यास त्यांना डॉक्टरकडे नेऊन त्यांची तपासणी करावी. शहरातून शेकडोच्या संख्येने गावाकडे परत जाणाऱ्या मजुरांना त्रास सहन करावा लागतो आहे. मजूर वर्ग शहरांच्या बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करावी. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये फ्ल्यू ओपीडी सुरु करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार असून पुढचे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावेळी सर्वच नेत्यांनी सरकारच्या सूचना व सोशल डिस्टन्शिंग पाळून प्रशासनाशी समन्वय ठेवून गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस