शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दिलासा! दोन्ही कोरोना लाटेत लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण सारखेच; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 06:59 IST

सर्वाधिक मृत्यू हे ६१ ते ७० वयोगटांतील, पहिल्या लाटेत १९.४४ लाख कोरोनाबाधित होते, तर ४५ हजार ४५६ मृत्यू झाले होते.

ठळक मुद्दे२०२१ मध्ये ३१.१७ लाख कोरोना रुग्ण, तर २४ हजार ४०० बळींची नोंद आहेअतिदक्षता विभागातील अत्यवस्थ रुग्णांत २० ते ५० वयातील रुग्णांचा समावेश आहे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण हे दोन टक्के होते, त्या तुलनेत एप्रिल २०२१ मध्ये मृत्यूचे प्रमाण ०.७७ टक्के असल्याचे दिसून आले

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा विचार करता, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झालेला आढळून आला होता. तर सर्वाधिक मृत्यू हे ६१ ते ७० या वयोगटात झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या दोन्ही लाटांतील संसर्गाची तीव्रता पाहता, दोन्ही लाटेत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या रुग्णांचा मृत्युदर सारखा असल्याचे दिसून आले आहे.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी सांगितले, राज्यात तरुण कोरोना रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अतिदक्षता विभागातील अत्यवस्थ रुग्णांत २० ते ५० वयातील रुग्णांचा समावेश आहे, मात्र कोरोना संसर्गाचे विश्लेषण करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण हे दोन टक्के होते, त्या तुलनेत एप्रिल २०२१ मध्ये मृत्यूचे प्रमाण ०.७७ टक्के असल्याचे दिसून आले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण कमी होणार असल्याचेही निरीक्षण आहे.

राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, पहिल्या लाटेत १९.४४ लाख कोरोनाबाधित होते, तर ४५ हजार ४५६ मृत्यू झाले होते. २०२१ मध्ये ३१.१७ लाख कोरोना रुग्ण, तर २४ हजार ४०० बळींची नोंद आहे. यंदा या आजाराची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले, तसेच अतिदक्षता विभागातही अधिक रुग्णांची नोंद झाली. मात्र डॉक्टरांचा अनुभवही अधिक असल्यामुळे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस