शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

CoronaVirus: नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील; प्रवीण दरेकरांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:36 IST

CoronaVirus: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देनवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील नवाब मलिक यांचे केवळ राजकारणाकडे लक्षदुसऱ्या राज्यांच्या चांगल्या गोष्टीही घ्याव्यात

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी केलेल्या टीकेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील, असे दरेकर यांनी म्हटले आहे. (coronavirus bjp pravin darekar replied nawab malik on corona situation) 

गेल्या सलग दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे. केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली  उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!

नवाब मलिक यांचे केवळ राजकारणाकडे लक्ष

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात नवाब मलिक यांनी उपाययोजना सुचवल्याचे कधी ऐकीवात नाही. उपलब्ध व्यवस्था गतिमान कशा होतील, याबाबत सूचना केल्याचे त्यांच्या प्रेममध्ये सांगितल्याचे मला आठवत नाही. केंद्राला टार्गेट करत केवळ आपल्या सोयीची दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत राजकारण करण्याचा प्रयत्न नवाब मलिक करताना दिसतायत, अशा शब्दांत दरेकरांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दुसऱ्या राज्यांच्या चांगल्या गोष्टीही घ्याव्यात

दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत असताना, त्या राज्यांनी कोरोनाच्या काय चांगल्या उपाययोजना, चांगल्या गोष्टी केल्या, त्या आपल्याकडे अमल करण्यासाठी राज्य सरकारने काय केले, याचे उत्तर नवाब मलिक देऊ शकत नाहीत, अशी टीका करत केंद्र आणि राज्य असा वाद आताच्या घडीला बंद होण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

“ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका

सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत परदेशातून आलेल्या मदतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. एक गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. आपण परदेशांना मदत केली नसती, तर आपल्याला मदत करण्याची भूमिका त्या देशांनी घेतली नसती. संकटाच्या काळात संकुचित विचार करणे योग्य नाही. व्यापकदृष्टिने विचार होण्याची गरज आहे. सुसंवादातून, चांगल्या समन्वयातून सर्वांनी एकत्रितपणे या संकटाला सामोरे जायला हवे. अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो, असे दरेकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरPoliticsराजकारण