CoronaVirus News: राज्यातील ९७ टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित; मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 20:36 IST2020-07-23T20:36:09+5:302020-07-23T20:36:26+5:30

CoronaVirus News: कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला रुग्णांचा समावेश

CoronaVirus 97 percent corona patients in state are asymptomatic | CoronaVirus News: राज्यातील ९७ टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित; मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक

CoronaVirus News: राज्यातील ९७ टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित; मृतांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक

- स्नेहा मोरे

मुंबई– राज्यात कोरोना बाधित रुग्णांची सख्या साडे तीन लाखांच्या टप्प्यावर यात १ लाख ३६ हजार रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ९७ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे व लक्षणविरहित असल्याचे दिसून आले आहे. तर २ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, त्याचप्रमाणे १ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

राज्याचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण महिला रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. राज्यातील कोरोना बाधितांमध्ये ६१ टक्के पुरुष व ३९ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत १७ लाख ४१ हजार ९९२ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत, त्यातील ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर २० टक्के प्रयोगशाळा नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना बाधितांच्या मृत्यूंमध्येही पुरुष रुग्णांचा आकडा अधिक आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. अतिजोखमीच्या आजारांमुळे आतापर्यंत राज्यात ७० टक्के रुग्णांचे मृत्यू झाले असून अन्य ३० टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. याविषयी, डॉ. सागर जोशी यांनी सांगितले सध्या कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल होतो आहे. त्यामुळे  लक्षण विरहित असलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही वेळा पहिल्या टप्प्यात या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाही, त्यावेळी यंत्रणाकडून लक्ष ठेवण्यात येते. त्यानंतर सात दिवसानंतरच्या काळात लक्षणे दिसू लागली वा प्रकृतीत सुधारणा न झाल्यास उपचारांची दिशा बदलण्यात येते.

१२ हजार ५९१ बालकांना कोरोनाची बाधा
राज्यात नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १२ हजार ५९१ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.८६ टक्के आहे. मागील काही दिवसांत बालकांना होणाऱ्या कोरोना (कोविड)च्या संसर्गात कमालीची वाढ झाली असून त्यात गुंतागुंतीच्या समस्याही दिसून आल्या आहेत. तर ११ ते २० वयोगटातील २२ हजार ३४५ मुला-मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
 

Web Title: CoronaVirus 97 percent corona patients in state are asymptomatic