Coronavirus : राज्यात ६७,१६० नव्या रुग्णांची नोंद; मुंबईत पुन्हा कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:54 PM2021-04-24T20:54:04+5:302021-04-24T20:55:48+5:30

Coronavirus in Maharashtra : शुक्रवारी मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या होती अधिक

Coronavirus 63818 new cases registered in maharashtra good news again for mumbai less petients found | Coronavirus : राज्यात ६७,१६० नव्या रुग्णांची नोंद; मुंबईत पुन्हा कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

Coronavirus : राज्यात ६७,१६० नव्या रुग्णांची नोंद; मुंबईत पुन्हा कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

Next
ठळक मुद्देसध्या देशातही होत आहे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद. शुक्रवारी मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या होती अधिक

सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सध्या आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह काही राज्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लावले आहेत. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 

गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ६७६ रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,९४,४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३४,६८,६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३९२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे.





मुंबईत कोरोनामुक्त अधिक

शनिवारीही मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ८,५४९ जणांनी कोरोनावर मात केली, तर ५,८८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मुंबईत सध्या ७८,७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ५,२९,२३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ८५ टक्क्यांवर तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर पोहोचला आहे.

Web Title: Coronavirus 63818 new cases registered in maharashtra good news again for mumbai less petients found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.