शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

CoronaVirus : खासगी कार्यालयांत 50 टक्के उपस्थिती; ...तर नाट्यगृहे, कारखाने करणार बंद, असे आहेत सरकारचे नवे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 3:23 AM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना राज्य शासनाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार सर्व ...

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना राज्य शासनाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार सर्व खासगी आस्थापना आणि कार्यालयांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांसाठी ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश आधीच काढण्यात आला आहे. (CoronaVirus: 50 percent attendance in private offices Know about new restrictions of the government)

नाट्यगृहे, सभागृहांमध्ये  कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कोरोनाचे संकट टळेपर्यंत ती बंद ठेवण्यात येतील. कारखाने  पूर्ण क्षमतेने चालविण्याची परवानगी दिली असली तरी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास तेही बंद केले जातील, असे राज्य शासनाने स्पष्टपणे बजावले आहे. 

ज्या कारखान्यांमध्ये उत्पादन होते त्या ठिकाणी शिफ्टमध्ये काम करावे. कर्मचाऱ्यांची जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

...अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन -राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याने अजूनही लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही कळकळीची विनंती आहे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात २५ हजार नवे रुग्णकोरोनाच्या लाटेचा दुसरा फेरा राज्याच्या डोक्यावर घोंघावत असून, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५,६८१ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईने दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत ३,०६२ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यातील गेल्या सहा दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या एक लाख नऊ हजार १७८ एवढी झाली आहे. 

नाट्यगृहात इतर कार्यक्रमांस मनाई -  नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही. -  या नियमांचे उल्लंघन झाल्यास ती  बंद करण्यात येतील, असा इशारा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेशात म्हटले आहे. -  धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर शासनाने ३१ मार्चपर्यंत बंदी आणली आहे.  -  या नियमाचे उल्लंघन केले तर कोरोना ही केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय आपत्ती असेपर्यंत ती बंद ठेवण्यात येतील असे शासनाने बजावले आहे.

३९,७२६ नवे रुग्ण देशात आढळले -देशात शुक्रवारी ३९,७२६ नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी १५४ जण मरण पावले असून, ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. कोरोना बळींची संख्या १ लाख ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे.

- 65 टक्के नवे रूग्ण एकट्या महाराष्ट्रातराज्यातील  पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक ही पाच शहरे हाॅटस्पाॅट 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे