शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 8:45 PM

कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे.

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपण सगळेच सहभागी झालो आहोत. घरातच राहून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करतोय. या लॉकडाऊनच्या काळात दिवसभर कुटुंबीयांसोबत राहायला मिळत असल्याचा आनंद असला, तरी प्रत्येकाच्याच मनात एक भीतीही आहे. हे असं संकट आपल्यावर किंवा देशावरच नव्हे, तर जगावर पहिल्यांदा ओढवलं आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येकालाच भक्कम मानसिक आधाराची गरज आहे. ती ओळखूनच मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'एमपॉवर'ने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेच्या साथीने नागरिकांसाठी ‘बीएमसी-एमपॉवर वनऑनवन’ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. 

कोरोनामुळे मानसिक तणावाखाली असलेली राज्यातील कुणीही व्यक्ती 1800-120-820050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अनुभवी समुपदेशकांचा किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन घेऊ शकते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ही सेवा उपलब्ध असेल.

राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. कोरोना नावाच्या संकटामुळे मनाने खचून गेलेल्या, भविष्याच्या काळजीने अस्वस्थ झालेल्या व्यक्तींनी या हेल्पलाईनचा आवर्जून फायदा घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.      एमपॉवर ही देशभरातील मानसिक आरोग्यविषयक समस्यांशी लढणारी आघाडीची संस्था आहे. आजच्या निराशाजनक वातावरणात नागरिकांना मनाने खंबीर करण्याच्या उद्देशानं या संस्थेच्या अध्यक्ष नीरजा बिर्ला यांनी राज्य सरकार आणि महापालिकेशी समन्वय साधून ही 24x7 हेल्पलाईन सुरू केली आहे.   

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAaditya Thackerayआदित्य ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका