शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात २३ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:11 IST

राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने तब्बल २३ हजारांचा टप्पा ओलांडल्याने पुन्हा एकदा मागील वर्षीच्या कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाची सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, यंत्रणांसमोर संसर्ग नियंत्रणाचे आव्हान असून, दुसरीकडे सामान्य नागरिकांनीही कोरोनाविषयी मनोवृत्ती बदलण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. यापूर्वी, सप्टेंबर महिन्यात दैनंदिन रुग्ण २० हजारांपर्यंत पोहोचले होते. (Corona's havoc, 23,000 patients a day in the state)

राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. सध्या राज्यात एक लाख ५२ हजार ७६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात नऊ हजार १३८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ टक्के झाले असून, मृत्युदर २.२४ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एक कोटी ७५ लाख ३५ हजार ४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख ७१ हजार ६२० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, सहा हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

बुधवारी नोंद झालेल्या एकूण ८४ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे ७, नाशिक ३, गडचिरोली २, नागपूर १ आणि नांदेड १ असे आहेत. या ८४ मृत्यूंमध्ये मुंबई ८, नवी मुंबई मनपा १, उल्हासनगर मनपा ८, रायगड १, पनवेल मनपा ३, नाशिक १, नाशिक मनपा ५, मालेगाव मनपा २, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव मनपा १, नंदुरबार १, सोलापूर २, सातारा १, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, जालना ७, उस्मानाबाद १, बीड २, नांदेड १, नांदेड मनपा २, अमरावती ४, अमरावती मनपा २, नागपूर ४, नागपूर मनपा १२, वर्धा २, चंद्रपूर २, गडचिरोली २ आणि अन्य राज्य-देशातील एका रुग्णांचा समावेश आहे.

बाधितांच्या प्रमाणात १३ टक्क्यांनी वाढ -राज्यात कोरोना प्रसाराचा वेग वाढला असून, बाधितांचे प्रमाण सरासरी १३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर आठवडाभरातील नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारांवरून ९० हजारांच्या घरात पोहोचली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षीच्या (२०२०) जुलैप्रमाणे स्थिती झाली असून, आठवड्याला ५० हजार रुग्णांची नव्याने भर पडली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णसंख्या ४ टक्क्यांनी वाढून ९० हजारांपर्यंत गेला आहे. यापूर्वी ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ८९ ते ९० हजार रुग्णांचे निदान होत होते.

मुंबईत २३७७ रुग्ण -- मुंबईत बुधवारी दोन हजार ३७७ रुग्ण आणि आठ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण  संख्या तीन लाख ४९ हजार ९५८ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ५४७ झाला आहे. सध्या शहर-उपनगरात १६ हजार ७५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.- मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १४५ दिवसांवर आला आहे. १० ते १६ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.४८ टक्के झाला आहे.- मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींत सक्रिय कंटेन्मेंट झोन्स ३४ असून, सक्रिय सीलबंद इमारती २६७ इतक्या आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील १२ हजार ६१ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाच्या ३६ लाख १४ हजार ५२८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सात दिवसांत एक लाख १८ हजार ४५० रुग्ण१७ मार्च     २३,१७९१६ मार्च     १७,८६४१५ मार्च     १५,०५११४ मार्च     १६,६२०१३ मार्च     १५,६०२१२ मार्च     १५,८१७११ मार्च     १४,३१७ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादnagpurनागपूरNashikनाशिकMalegaonमालेगांवthaneठाणे