शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : अबब! विदर्भ, मराठवाडा, खान्देशएवढा ऑक्सिजन लागतोय एकट्या पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 12:41 IST

राज्यात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा जवळपास २ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे.

ठळक मुद्दे पुणे जिल्ह्यात पावणे दोन लाख रुग्ण उपचारानंतर झाले आहेत बरे दैनंदिन गरज व ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये करावी लागत आहे तारेवरची कसरत

राजानंद मोरे/निनाद देशमुखपुणे : कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढण्याबरोबरच पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्याच्या एकुण मागणीच्या तुलनेत जिल्ह्यातच जवळपास २७ टक्के आॅक्सिजन लागत आहे. सध्याची पुण्याची गरज सुमारे २२० मेट्रिक टन एवढी असून राज्यात सुमारे ८१० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे.  विदर्भ, मराठवाडा व खान्देशात लागणाऱ्या ऑक्सिजनएवढा पुरवठा एकट्या पुण्याला करावा लागत आहे.

राज्यात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा जवळपास २ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. तर पावणे दोन लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सर्वाधिक कोविड रुग्णालयेही पुण्यात आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार, सध्या रुग्णालयात ऑक्सिजन तसेच आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णांचा आकडा ६ हजारांहून अधिक आहे. इतर जिल्ह्यातील रुग्णही पुण्यात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऑ क्सिजनची मागणी दिवसेदिवस वाढत चालली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्याला सध्या दररोज सुमारे ८०९ मेट्रिक टन आॅक्सिजनची गरज भासते. त्यामध्ये एकट्या पुण्याचा वाटा २२० मेट्रिक टन एवढा आहे. हा आकडा राज्याच्या एकुण मागणीच्या एक चतुर्थांश आहे. तसेच मराठवाडाविदर्भासह खान्देशात लागणाºया आॅक्सिजनएवढा आॅक्सिजन पुणे जिल्ह्याला पुरवावा लागत आहे.

पुण्यापाठोपाठ मुंबई (९१.३१४), ठाणे व पालघर (८५.५१०), नाशिक (५८.५००) आणि कोल्हापुर (५०) या जिल्ह्यांना सर्वाधिक ऑक्सिजनची गरज भासत आहे. विभागनिहाय आकडे पाहिल्यास पुणे विभागाला सर्वाधिक ३३३.७८ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. त्यापाठोपाठ नाशिक आणि ठाणे विभाग आहे. बहुतेक विभागांमध्ये दैनंदिन गरज व ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.-------------------------ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी असलेले जिल्हेजिल्हा मागणी (मेट्रिक टन)पुणे २२०मुंबई ९१.३१४ठाणे/पालघर ८५.५१०नाशिक ५८.५००कोल्हापुर ५०----------------------राज्यातील विभागनिहाय ऑक्सिजनची गरज व पुरवठा (दि. १२ सप्टेंबर) -विभाग   कोविड रुग्णालये    दैनंदिन गरज (मेट्रिक टन) पुरवठा                  साठापुणे          ४०८                   ३३३.७८                          ३२५.७६               ११५.९अमरावती २२                       २६.५६६                         २६.३४०                ४.५३औरंगाबाद ७६                       ७४.८३०                        ४७.८९२              २६.५६८नागपूर      ६०                        ५२                               ६१                      ७९नाशिक    २७०                      ११५.७४०                    ९४.३००                   १९.४मु्ंबई      ५४                         ९१.३१४                      १०३.९८६              १२.६७२ठाणे       ११२                     ११४.९९०                   १०६.५७०               १२२.०८६------------------------------------------------------------------------एकूण  १००२                   ८,०९.२२                         ७,६५.८४८             ३८०.१६------------------------------------------------------------------------                                              सहा कंपन्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजन निर्मितीचे परवाने देण्यात आले आहेत. ऑक्सिजनच्या वाहतूकीसाठी साधा टँकर लागत नाही. त्यासाठी क्रायोजनिक टॅकर लागतो. तो आपलयाकडे नव्हता. त्याची वाहतूक करणेही धोकादायक असते. या टॅकरची अडचण सध्या जाणवत आहेत. सध्या एका बेडसाठी तीन सिलेंडर लागतात. एक सिलेंडर कनेक्ट असणार आहे. दुसरा सिलेंडर स्टोअरेजसाठी तर तिसरा सिलेंडर बॉटलींग युनिककडे असणार आहे. याचे मॅनेजमेंट करन्याच्या सुचना दवाखान्यांना दिल्या आहेत. पुण्यात डीपीडीसीमधून ५०० सिलेंडरचे ऑर्डर दिली आहे. आता पुन्हा ५०० सिलेंडरसाठी निधी देण्यात येणार आहे. या सिलेंडरची निर्मिती पुण्यात होत नाही. ती गुजरात व ठाण्यात होते. वाहतूक आणि सिलेंडर या प्रमुख अडचणी आहेत. आणि तिसरी अडचण म्हणजे पुण्यात तयार होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण विभागात करायचा असतो. यामुळे तुटवडा जाणवत आहे.- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे व विभागीय ऑक्सिजन पुरवठा समन्वयक

टॅग्स :PuneपुणेMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकार