शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :लॉकडाऊन काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या; मनसेचे गृहमंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 20:05 IST

लॉकडाऊन काळात राज्यात 1 लाख 30 हजार 396 गुन्हे दाखल

ठळक मुद्देआधीच महाराष्ट्रातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवरगृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्राच्या प्रती

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर कलम १८८ नुसार जोरदार कारवाया राज्यभरात सुरू करण्यात आल्या होत्या. या कालावधीत राज्यभरात १ लाख ३० हजार ३९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २६ हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या भवितव्याचा विचार करून हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती अद्यापही कायम आहे. नागरिकांनी एकत्र येणे टाळावे याकरिता शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येत होती. पोलिसांनी याकाळात नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर खटले भरले. हे खटले मागे घ्यावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते १५ जून या कालावधीत कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३० हजार ३९६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, २६ हजार ८८७ व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांची खूप हेळसांड झालेली आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अनेकजण त्यांच्या सरकारी किंवा खासगी नोकरीवर अवलंबून आहेत. त्यांच्यावर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यांमुळे त्यांच्या नोकरीस धोका व अडचण निर्माण होऊन रोजगाराची समस्या उद्भवू शकते. आधीच महाराष्ट्रातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात कोरोना मधील या केसेस म्हणजे लोकांचे मरण अशी स्थिती होईल. हे गुन्हे मागे घेऊन या नागरिकांना दिलासा देण्याची मागणी मनसेने केली आहे.

गृहमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्राच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAnil Deshmukhअनिल देशमुखMNSमनसेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या