Corona Virus: अरे देवा, सेलिब्रिटींचा केअर टेकरच निघाला कोरोना पॉझिटीव्ह, परिसरातील नागरिकांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:08 PM2020-05-11T12:08:33+5:302020-05-11T12:09:22+5:30

तसेच काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वीच या परिसरातील एका बिल्डिंगमध्ये 11 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.

 Corona Virus: T-Series Office Sealed After Caretaker Tests Positive For COVID-19: Report-SRJ | Corona Virus: अरे देवा, सेलिब्रिटींचा केअर टेकरच निघाला कोरोना पॉझिटीव्ह, परिसरातील नागरिकांची चिंता वाढली

Corona Virus: अरे देवा, सेलिब्रिटींचा केअर टेकरच निघाला कोरोना पॉझिटीव्ह, परिसरातील नागरिकांची चिंता वाढली

googlenewsNext

दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कुठेही ही संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अशात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंधेरी येथील टी-सिरीजच्या ऑफिसचा केअर टेकरलाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर बीएमसीने संपूर्ण बिल्डिंगसह परिसर सील केला आहे. या परिसरात अनेक सेलिब्रिटींचे फ्लॅट आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना आता याची चांगलीच धास्ती घेतली आहे. अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे.

बिल्डिंगमधील इतरांचाही कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दरम्यान टी सीरीज ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी 15 मार्चपासून बंद होते. कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वीच काही दिवसांपूर्वीच या परिसरातील एका बिल्डिंगमध्ये 11 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यापाठोपाठ आता दुसरा रूग्ण आढळल्याने नागरिकांची चिंतेत वाढ झाली आहे.

या परिसरात विकी कौशल, राज कुमार राव, चित्रांगदा सिंह, चाहत खन्ना, अहमद खान, सपना मुखर्जी, राजकुमार राव-पत्रलेखा, राहुल देव, मुग्धा गोडसे, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, नील नितिन मुकेश, आनंद एल. राय, अर्जन बाजवा, विपुल शाह आणि प्रभुदेवा या सेलिब्रिटींचे फ्लॅट आहेत.
 

Web Title:  Corona Virus: T-Series Office Sealed After Caretaker Tests Positive For COVID-19: Report-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.