राज्यात पाच महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद; सापडले १३ हजारांपेक्षा अधिक बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:26 PM2021-03-10T22:26:49+5:302021-03-10T22:29:20+5:30

Coronavirus In Maharashtra : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होत आहे वाढ

corona virus patients numbers increased more than 13 thousand in maharashtra after 5 months | राज्यात पाच महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद; सापडले १३ हजारांपेक्षा अधिक बाधित

राज्यात पाच महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद; सापडले १३ हजारांपेक्षा अधिक बाधित

Next
ठळक मुद्दे २४ तासांत राज्यात १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंदराज्यात ९९ हजार ००८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आणि पालिका क्षेत्रांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात येत आहे. परंतु अशातच पुन्हा एकदा बुधवारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत राज्यात १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत १,५३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून  राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. परंतु बुधवारी गेल्या पाच पहिन्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये ९,९१३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं. तसंच ५४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यात ९९ हजार ००८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी हाराष्ट्रात सर्वाधिक ११ हजार रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या दिवशी राज्यात ११ हजार ४४७ नवे रुग्ण सापडले होते. 



राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच कोरोनाच्या वाढत्या संख्येने पुन्हा आरोग्य यंत्रणेसमोर समस्या उभी केली आहे. राज्यातील एकूण रुग्णांचं प्रमाण जानेवारी महिन्यात दोन ते अडीच हजारांच्या घरात आलं होतं. परंतु फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागानं सर्पकांत आलेल्यांचा तपास, संक्रमित लोकांच्या जवळच्यांची ओळख पटवणं, तेजीनं चाचण्या, हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या अशा बाबी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या प्रकरणी ३ मार्च रोजी सर्व जिल्हा प्रशासनांना पत्र पाठवलं होतं. तसंच यावर कठोर पावलं उचलण्याचे निर्देशही दिले होत. 

Web Title: corona virus patients numbers increased more than 13 thousand in maharashtra after 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.