Corona virus : कोरोनाबाधितांवरील उपचारांपैकी एक असलेल्या 'या'औषधावर खासदार अमोल कोल्हेंची महत्वपूर्ण मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:22 PM2020-08-07T17:22:56+5:302020-08-07T17:31:23+5:30

कोरोनाच्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांवरील उपचारासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या सल्ल्यानुसार हे औषध प्रमाणित व मान्य करण्यात आले आहे...

Corona virus : MP Amol Kolhe's important demand one of the medicine who use in treatments for corona patients | Corona virus : कोरोनाबाधितांवरील उपचारांपैकी एक असलेल्या 'या'औषधावर खासदार अमोल कोल्हेंची महत्वपूर्ण मागणी

Corona virus : कोरोनाबाधितांवरील उपचारांपैकी एक असलेल्या 'या'औषधावर खासदार अमोल कोल्हेंची महत्वपूर्ण मागणी

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालण्यासंबंधी पत्र आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे टास्क फोर्स व तज्ज्ञांमार्फत योग्य सूचना जारी करण्याची मागणी

शेलपिंपळगाव : गंभीर व अतिगंभीर कोविड - १९ बाधित रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे Tocilizumab हे औषध परिणामकारक नसल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनात आढळून आल्याचे रोश फार्मा (Roche Pharma) या मूळ कंपनीनेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे टास्क फोर्स व तज्ज्ञांमार्फत योग्य सूचना जारी करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


          कोविड - १९ च्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी Tocilizumab हे औषध भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या सल्ल्यानुसार प्रमाणित व मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यात Tocilizumab या औषधाचा सर्रास वापर वापर केला जात आहे. एकीकडे या औषधाची मागणी वाढल्याने मूळ रु. ४०,००० इतकी किंमत असलेल्या या औषधाची एक लाख रुपये किंमतीला विक्री होऊ लागली आहे. तर Tocilizumab औषधाची मूळ संशोधक असलेल्या रोश फार्मा (Roche Pharma) या कंपनीने २९ जुलैला आंतरराष्ट्रीय संशोधनात Tocilizumab हे औषध गंभीर अथवा अतिगंभीर रुग्णांसाठी परिणामकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून देत टास्क फोर्स व तज्ज्ञांमार्फत योग्य सूचना जारी करण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

        अशाप्रकारे मार्गदर्शक सूचना जारी केल्यास डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन मिळेल शिवाय Tocilizumabचा सर्रास वापर थांबून काळ्याबाजारातील विक्रीला आळा बसेल असे मतही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. कोविड-१९चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून डॉ. कोल्हे यांनी सातत्याने औषधांच्या किंमती व त्याच्या परिणामकारकते विषयी रुग्णांची फसवणूक होऊ नये यासाठी दक्ष राहून राज्य व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना वेळोवेळी पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Corona virus : MP Amol Kolhe's important demand one of the medicine who use in treatments for corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.