बूम बोले लेखणीला, झाला रंगाचा बेरंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥धृ॥कोरोनाने गिळले रंक आणि रावयात नाही कोणताच केला भेदभावजागे होऊ आता सारे देऊ साथसंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥१॥पत्रकारितेत पोटापायी काया झिजवलीसंसर्ग सोसुनिया बातमी पोहोचवलीडळमळू लागे चौथा लोकशाहीचा स्तंभदेवाघरी अकाली गेला आपला पांडुुरंग ॥२॥तत्पर वार्तांकनी देह बुडूनिया जाईघर-दार, बायको-मुले पोरकीच होईमदतनिधी मिळणारा मात्र गेला नि:संगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥३॥कोण-कशाबद्दल-कुठे-केव्हा-का नि कसे?बातमीत उत्तर शोधताना पत्रकारच फसेस्पॉटवरून लाईव्ह, पण लाईफ होई भंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥४॥अनेकांवर अन्यायाला फोडली वाचाप्रश्नांनी माझ्या बंद प्रस्थापितांची भाषाघेई विषाणू दंश, पण मी बाईटमध्ये दंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥५॥
- अभय नरहर जोशी -