शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाला कोरोनाचा फटका; लॉकडाऊनमध्ये वाहनविक्री 'रेड झोन' मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 12:06 IST

राज्यात ल अडीच महिन्यात जवळपास 52 हजार तर पुण्यात फक्त चार हजार वाहनांची नोंदणी

ठळक मुद्देदेशात 2016 ते 2018 या कालावधीत वाहनविक्रीत सातत्याने वाढ

राजानंद मोरेपुणे : मागील वर्षी विक्री कमी झाल्याने संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाला यंदाही कोरोनाचा फटका बसत आहे. लॉकडाऊनमध्ये एप्रिलपासून अत्यल्प वाहनविक्री झालेली आहे. राज्यात अडीच महिन्यांत जवळपास ५२ हजार तर पुण्यात केवळ चार हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. एकट्या मार्चमध्ये ही नोंदणी अनुक्रमे २ लाख ६८ व २० हजार एवढी झाली होती. अनलॉकच्या काळात जूनमध्ये काहीशी स्थिती सुधारताना दिसत असली तरी वाहनविक्रीतील वाढ नगण्य आहे.देशात २०१६ ते २०१८ या वर्षात वाहन विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण २०१९ मध्ये जागतिक आर्थिक मंदीचा फटका या उद्योगाला बसल्याने या तीन वर्षांतील नीचांकी वाहन विक्री झाली. ही स्थिती २०२० मध्ये काहीशी सुधारू लागलेली असतानाच कोरोनाचे संकट उभे ठाकले. देशभरातील लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने वाहनविक्री जवळपास ठप्प झाल्याचे चित्र आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असल्याने अधिक फटका बसला आहे. तर राज्यात सर्वाधिक वाहन नोंदणी व महसुल पुणे आरटीओमध्ये जमा होता. पण मागील तीन महिने वाहन विक्री रेड झोनमध्ये गेली आहे.--------------------मेच्या तुलनेत जूनमध्ये वाढमार्च महिन्याच्या शेवट्याच्या आठवड्यात लॉकडाऊन झाल्यानंतर बीएस ४ निकषाच्या वाहन नोंदणीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. या महिन्यात पुण्यात सुमारे १ हजार वाहननोंदणी झाली. तर दि. १८ मेपासून नियमित वाहनविक्री सुरू झाली. पण सुरूवातीचे काही दिवस ग्राहकच घराबाहेर पडत नसल्याने केवळ ६५८ वाहनांची विक्री झाली. जूनमध्ये ही स्थिती काहीशी सुधारताना दिसत आहे. दि. १७ जूनपर्यंत पुण्यात २ हजार ३०० वाहने विकली गेली.-----------------------रस्त्यावर येणार कमी वाहनेपुण्यात दरवर्षी सुमारे अडीच लाख वाहने रस्त्यावर येतात. पण कोरोना संकटामुळे यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरणार आहे. मागील अडीच महिन्यांत केवळ चार हजार वाहनांची नोंदणी झाल्याने यंदा किमान लाखभर नवीन वाहनांची भर पडणार नाही. त्यामुळे दरवर्षी रस्त्यावर वाढणारी वाहने यंदा किमान एक लाखाने कमी होणार आहेत.----------------------यंदाची वाहनविक्रीची स्थिती (स्त्रोत - परिवहन पोर्टल)महिना महाराष्ट्रजानेवारी - २,१४,५६४फेब्रुवारी-  १,७३,०८९मार्च - २,६८,२००एप्रिल-  २१,५३५मे - ५,७४३जून (दि. १७ पर्यंत) - २५,३५०------------------------------------------मागील तीन वर्षाची पुण्याची स्थिती (स्त्रोत - परिवहन पोर्टल) -वर्ष/महिना।  मार्च       एप्रिल       मे            जून२०१८      २६,४५१  २२,३७४   २३,१४१     २०,८५९२०१९      १९,४९४  २२,८२५   २३,१४१।   १६,०२२२०२०      २०,८०५   १,०३४      ६५८         २,२९२----------------------------------------पुण्यातील (एमएच १२) वाहन विक्री (स्त्रोत - परिवहन पोर्टल)वर्ष विक्री२०१६ २,५५,७२४२०१७ २,६६,१७९२०१८ २,७८,९२८२०१९ २,४४,९८४२०२० (१७ जूनपर्यंत) ६५,२९९-----------------------------

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरRto officeआरटीओ ऑफीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस