शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Corona virus : लॉकडाऊनचा कालावधी वाढला तरी कोरोनाची साखळी पूर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 20:24 IST

कोरोना संसर्गाची साखळी लगेच तुटणार नाही. मात्र, संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येण्यास लॉकडाऊनमुळे मदत होणार

ठळक मुद्देभारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीला प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना सातत्याने प्रयत्नशील राहणे तसेच नागरिकांनी यापुढील काळातही स्वच्छतेला महत्व देणेबाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना लक्षणे नसताना चाचणी केल्यास ती येऊ शकते निगेटिव्ह

पुणे : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविला असला तरी ही साखळी पुर्णपणे तुटणे सध्यातरी कठीण आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे. पण जोपर्यंत नवीन रुग्ण आढळून येत आहेत, तोपर्यंत धोका टळलेला नाही. कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी योग्य असली तरी काही भागात तेथील संसर्गाची स्थिती पाहून ती शिथीलही करता येऊ शकत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच एकदा कोरोना झालेल्या किंवा अहवाल निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो. त्यामुळे नवीन व्यक्तीला संसर्ग होणार नाही, यादृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहणे तसेच नागरिकांनी यापुढील काळातही स्वच्छतेला महत्व देणे, हे खरे आव्हान असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरूवातीला प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर एकदिवसाची जनता संचारबंदी करून लॉकडाऊनचे संकेत दिले गेले. तर दि. २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण या कालावधीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. लॉकडाऊनमुळे इतर देशांच्या तुलनेत हा आकडा मर्यादित राहिला, हेही मान्य करावे लागेल. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याबद्दल भारताचे कौतुक केले. पण त्याचवेळी लॉकडाऊन अवेळी उठविल्यास ही महामारी उलटूही शकते, असा इशाराही दिला. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा कालावधी दि. ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. हा लॉकडाऊन १९ दिवसांचा असेल. म्हणजे एकुण लॉकडाऊनचे ४० दिवस होतात. त्यानंतरचा निर्णयही बाधित रुग्णांचा आलेख पाहून घेतला जाईल. पण या ४० दिवसांनंतरही आपण कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडू शकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.देशपातळीवरील विषाणु प्रयोगशाळेतील एका शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमुळे लोकांचा संपर्क कमी झाला आहे. कार्यालये, दुकाने, उद्योग, व्यवसाय, प्रवास बंद आहे. त्यामुळे वेगाने नवीन संसर्ग होत नाही. पण अनेक लोकांमध्ये लक्षणे नसली तरी त्यांना संसर्ग झालेला असू शकतो. त्यांच्यामुळे कुटूंबाला किंवा बाहेर इतरांनाही धोका आहेच. पण हे कमी प्रमाणात होईल. अनेकांना पुढील काही दिवसांत त्यांना लक्षणे दिसणारही नाही. पण लॉकडाऊननंतर लक्षणे दिसू शकतात किंवा त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाची साखळी पुर्ण तुटणार नाही. पण ससंर्गची पातळी मात्र निश्चितच कमी होईल. त्यानुसार विशिष्ट भागातील कोरोनाची पातळी पाहून, तेथील किती लोकांना संसर्ग झाला आहे, किती बरे झाले आहेत, याची चाचपणी करून संचारबंदीचे नियम शिथील करता येऊ शकतात.-----------कोरोना संसर्गाची साखळी लगेच तुटणार नाही. मात्र, संसर्ग मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येण्यास लॉकडाऊनमुळे मदत होणार आहे. पुढील स्थिती पाहून लॉकडाऊनचे दिवस कमी करणे किंवा शिथिल करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. कोणतीही साथ पुर्णपणे जात नाही. अधूनमधुन विविध देशांमध्ये साथ येऊन जाते. पण जर कोरोनाबाधिताचा प्रत्येक संपर्क शोधून विलग केल्यास देशांतर्गत कोरोनाची साखळी तोडता येऊ शकते. व्यक्तीमध्ये नसलेला कोरोना विषाणु काही कालावधीने नष्ट होतो. पण त्यासाठी बराच काळ जावा लागेल.- डॉ. अविनाश भोंडवे,अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र-----------कोणताही विषाणु किती काळ राहील, हे कोणीच सांगु शकत नाही. २००२ मध्ये आलेला सार्स एक वषार्नंतर गायब झाला. एच ५ एन १ ची साथही दोन वर्षांनी गेली. पण २००९ मध्ये आपल्याकडे आलेला स्वाईन फ्लू आजही टिकून आहे. कोरोनाच्या बाबतीतही असे होऊ शकते.वेगवेगवेगळ्या विषाणुचे  वातावरणात राहण्याची क्षमता, संसगार्चा वेग वेगळा असतो. त्यामुळे तो कधी जाणार, हे सांगणे कठीण असते.- डॉ. अखिलेश मिश्रा, माजी संचालक, राष्ट्रीय विषाणु संस्था-------------एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना लक्षणे नसताना चाचणी केल्यास ती निगेटिव्ह येऊ शकते. पण नंतर त्यांना संसर्ग होण्याचा धोका कायम आहे. तसेच एखादा पॉझिटिव्ह रुग्ण बरा होऊन घरी परतल्यानंतर त्याला पुन्हा लागण झाल्याचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. त्यांची प्रतिकारशक्ती तयार झालेली असते. पण प्रतिकारशक्ती कमी झाल्यास लागण होऊ शकते.- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका-------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे